सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे उर्वरित काम लवकर पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या सूचना  

author
0 minutes, 6 seconds Read
Spread the love

कोपरगाव,दि.२:- कोपरगाव मतदार संघातील नागरीकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या.

सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंतच्या महामार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला असून ७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळविला आहे. या रस्त्याचे काम अंतिम टप्याकडे जात असून सावळीविहीर फाटा ते पुणतांबा फाटा पर्यंत तसेच बेट नाक्याच्या पुढे काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे बहुतांश प्रमाणात वाहतुकीची समस्या संपुष्टात आली आहे.

सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शुक्रवार दि.२ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची व संबंधित ठेकेदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेवून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याच्या कामाची माहिती जाणून घेतली. पुणतांबा फाटा व बेट नाका परिसर सोडल्यास रस्त्याचे काम पूर्ण होवून गोदावरी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे नागरीकांच्या व वाहनधारकांच्या समस्या कमी झाल्या आहेत. पुणतांबा फाटा चौफुलीच्या दोन्ही बाजूने सर्विस रोडचे काम पूर्ण होवून बेट नाका या ठिकाणी काम सुरु आहे. 

त्यामुळे वाहतुकीच्या अडचणी दूर झाल्या असल्या तरी सुरु असलेल्या कामाची गती वाढवून पुणतांबा फाटा व बेट नाका परिसरातील रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर काम पूर्ण होईल याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या.बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यशवंत कोलते, नितीन यविल,विनोद मेने, ठेकेदार प्रतिनिधी पालवे,गंभीरे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *