गणेश ओझा,संपादक
सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील ५ वर्षाची कादंबरी भूषण लढ्ढा हिने स्केटिंग सारख्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयपातळीवर यशाला गवसणी घातली आहे.
खोपोली येथील याक पब्लिक स्कूल,एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन फॉर नॅशनल लेव्हल सिलेक्शन येथे पार पडलेल्या स्केटिंग रिंक ट्रॅक क्वाड्स प्रकारात ६ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात तिने कांस्य पदक मिळवीत एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन पुणेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे तिला प्रशिक्षक उत्तम सानप अनुज स्केटिंग क्लब,नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.
स्केटिंगचा सराव कादंबरीने वयाच्या तिसऱ्या वयापासून सुरू केलेला असून स्थानिक आणि जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावलेले आहे.पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय लेव्हलसाठी तिची निवड झाल्याने परिसरात कौतुक होत आहे.