सिन्नर,दि.१८- सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील वावी,घोटेवाडी व वल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हिंदुस्तान कॅटल फीड्स पशुखाद्य कंपनीच्यावतीने विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व बॅग वितरित करण्यात आली.
पशुखाद्यकंपनीचे विक्रेते धिरज भुतडा यांनी कंपनीकडे पाठपुरावा करून सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तूची मागणी केली होती त्याला कंपनीचे व्यवस्थापक सागर कापकर यांनी तात्काळ मंजुरी देत वावी केंद्रातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्याबाबत भुतडा यांच्याकडून माहिती घेत जेवणाचा डबा व बॅग यांचे वाटप वावी प्राथमिक शाळा,निमोणीचा मळा,घोटेवाडी व वल्हेवाडी शाळेत केले असून दरवर्षी कंपनी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.
यावेळी सरपंच विजय काटे,हिंदुस्तान कॅटल फीड्सचे व्यवस्थापक सागर कापकर ,कन्हैयालाल भुतडा,दिलीप वेलजाळी,गणेश वेलजाळी,रवींद्र वेलजाळी,गणेश नामदेव वेलजाळी,आकाश वेलजाळी,कौशिक सोमानी,दिनकर कवाडे आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शेवरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाणके यांनी मानले.