मिठसागरे येथे रामनवमी उत्सव साजरा

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

गणेश ओझा,संपादक

   यावर्षी इयत्ता दहावी सन १९८८- ८९ च्या बॅचने फराळाच्या पंगतीची धुरा सांभाळली.नानासाहेब चतुर, बापूसाहेब चतुर,राजेंद्र कथले,आनंदा कांदळकर, सर्जेराव कांदळकर,गोरख चतुर,डॉ.सुनील कासार यांनी नियोजन केले.रामजन्म सोहळ्याचे निमित्ताने ह.भ.प बाबुराव महाराज काळे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.महिला भाविकांनी पाळणा गाऊन सोहळ्याचा आनंद घेतला.फराळाची संतपंगत यशस्वी करण्यासाठी डॉ. गंगाधर कासार,नवनाथ जाधव,भाऊसाहेब काळे,बाळासाहेब फापाळे, राजाराम झालटे, विजय गायकवाड आदींनी सहकार्य केले.

    रामजन्म सोहळ्यासाठी सौ.कांता जोशी पाठक, सौ. मंगल भवर कथले,सौ.शांता रक्ताटे चतुर, संजीवनी पगार चतुर, छाया गोडगे चतुर,सौ.आशा वाणी चतुर,सौ.मिरा गडाख चतुर,सौ.निर्मला काटे काकड यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील माजी विद्यार्थ्यांनी गावातील राममंदिरासाठी सढळ हाताने मदत करुन सप्ताहाची परंपरा,दानाची परंपरा कायम राखली रामजन्म सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला यावेळी पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *