जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.२७-लातूर जिल्ह्यामध्ये गांजा लावल्याप्रकरणी एका शेतकऱ्यावर गुन्हा नोंद तर दुसऱ्या शेतकऱ्याने खसखसची लागवड केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.महत्त्वाचा विषय जो आहे तो असा की “मरता क्या नही करता” या म्हणीप्रमाणे ज्या वेळेस शेतकऱ्याच्या शेतीमालाला खर्चही भरून निघणार नाही असा भाव मिळत असेल तर शेतकरी ते पीक काय म्हणून लावतील.सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली.आत्महत्या करण्यापेक्षा गांजा व आफूची झाडे लावल्यानंतर गुन्हा नोंद होतो जेलमध्ये जावे लागते कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात आर्थिक हानी सहन करावी लागते हे सर्व माहीत असताना सुद्धा शेतकरी असे निर्णय घेण्याचे कारण जर असेल तर ते एकमेव कारण म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव न मिळणे हेच आहे प्रशासन जेवढी तत्परता गांजा व खसखस लावलेल्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची दाखवते तितककिच तत्परता एम एस पी पेक्षा म्हणजे हमी भावापेक्षा कमी मध्ये शेतीमाल खरेदी करणारा वर का गुन्हे दाखल करत नाहीत? त्याचे कारण असे की ज्या यंत्रणेमुळेच शेतीमालाचे भाव पडले तीच यंत्रणा गुन्हे दाखल करण्यामध्ये उभी आहे.त्यामुळे खसखस गांजा या पिकाकडे शेतकरी नाईलाजाने जात आहे.शेतकऱ्यांनी गांजा व खसखस ची लागवड करणे म्हणजे शेतीमालाच्या भावाचा उद्रेक म्हणावा लागेल सरकारला हे जर थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देणे हाच एक उपाय आहे .अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही थांबणार नाहीत. व शेतकरी गांजा खसखस किंवा अन्य कोणतेही पीक आपल्या शेतामध्ये लावण्याचे थांबण्याची शक्यता दिसत नाही असे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.