गोडगे पाटील विद्यालयाचा सलग दहाव्यावर्षीही १००%. निकालाची परंपरा कायम

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
गणेश ओझा, प्रतिनिधी
सिन्नर,दि.१३- आर.पी.गोडगे पाटील पब्लिक स्कूल , ज्युनिअर कॉलेजचा शालांत परीक्षा-२०२५ चा दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने सलग १० वर्षाची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. 
इंग्रजी माध्यमामध्ये कु. सेजल विलास महाले हिने ९४.६०% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला. सार्थक रमेश पांगारकर याने ९२.८०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कु. सिद्धी रमेश लांडे हिने ९१.२०%. गुण प्राप्त करुन तृतीय  क्रमांक मिळविला. 
     सेमी इंग्रजी माध्यमात कु. अंजली सुनिल थोरात हिने ९४.००% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला तर कृष्णा चंद्रभान रहाणे याने ९२.६०% गुण मिळवत द्वितीय  क्रमांक  तर कु. प्रणाली सुधीर ढमाले हिने ९१.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई गोडगे पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत गोडगे पाटील तसेच शाळेचे  प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  पालक यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या  उज्जवल  भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *