सिन्नर,दि.२०-संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील बारा वर्षाच्या निष्पाप शालेय विद्यार्थिनीवर भरस्त्यात भीषण ऍसिड हल्ला करणाऱ्या नराधमाला अटक करून फाशीची शिक्षा द्या असे निवेदन संविधान सन्मान समितीकडून सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
यावेळी संदीप भालेराव,गौतम खरात,राहुल जाधव,तुषार जाधव,शशिकांत आढागळे,सतिश साबळे,देविदास आढागळे,सचिन गवारे,भूषण जाधव,सुशांत जगताप, शिरसाट नितीन,जगताप दर्शन,भाऊसाहेब शिंदे,गणेश कुरे, सचिन जाधव,श्याम पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.