कोपरगाव,दि.२१- शहरातील ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता. याची गांभीर्याने दखल घेवून या वाडा संवर्धनासाठी आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. त्यातील ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या दुसऱ्या हफ्त्याच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.