नांदूरशिंगोटे येथे ज्वेलर्स दुकानातून भरदिवसा ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

     नांदूरशिंगोटे येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक सुबोध अशोक माळवे (४१) यांनी तक्रार दिली आहे. सायंकाळी सुमारे ५.१५ ते ५.३५ वाजेच्या दरम्यान तीन अज्ञात महिला ग्राहक बनून त्यांच्या दुकानात आल्या. या महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करत विविध दागिने दाखविण्याची मागणी केली. त्या वेळी फिर्यादीची पत्नी रूपाली माळवे यांना दागिने दाखविण्यात गुंतवून ठेवत आरोपी महिलांनी दुकानातील २२ कॅरेट सोन्याच्या कानातील रिंगांचे सहा जोड (अंदाजे ११ ग्रॅम), किंमत सुमारे ७० हजार रुपये, लबाडीने चोरून नेले. या तिघी महिलांपैकी एक महिला उंच, गोऱ्या वर्णाची आणि मजबूत शरीरयष्टीची असून, वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. दुसरी महिला सावळ्या वर्णाची, मध्यम बांध्याची आणि कमी उंचीची असून वय अंदाजे ३५ वर्षे आहे. तिसरी महिला सावळ्या वर्णाची, जाड बांध्याची आणि कमी उंचीची असून, वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. तिन्ही महिलांनी सहा वारांची साडी परिधान केली होती. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *