नॅचरल डेअरी दुष्काळी भागात यशस्वी दुधउद्योग करण्याचे नेतृत्व करणारा प्रकल्प-बी.बी.ठोंबरे

author
0 minutes, 4 seconds Read
Spread the love

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी

     यावेळी बोलताना डाॅ.पराग घोगळे यांनी सांगितले की, दुध धंदयाकडे व्यवसाय म्हणून पाहावे. दुध व्यवसाय शास्त्रीय पध्दतीने, नियोजनबध्द व मन लावून केला तर १५ ते २० टक्के दुध उत्पादन वाढते. दुध व्यवसायातीत महत्वाचे खालील तत्वाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.त्यामध्ये जनावरांसाठी मुक्त गोठा पध्दतीचा अवलंब

करणे,उन्हाळयात जनावरांना पिण्याचे पाणी शुध्द व थंड असले पाहिजे.जनावरांचे योग्य वेळी व नियमीत लसीकरण करणे. जनावरांना ठराविक अंतराने जंताचे औषध दिले पाहिजे. जनावरांच्या आहारांचे नियोजन व वासरांचे योग्य संगोपन याबाबी आवश्यक असल्याचे सांगितले.

     नॅचरल डेअरीचे माध्यमातून सर्व सामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचे मोठे काम केले आहे.मराठवाडा व त्यातील दुष्काळी भाग म्हणून गणलेला धाराशिव, बीड व लातूर जिल्हा यामध्ये दुध व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करण्याचे काम नॅचरल डेअरीनेकेले.अवघ्या दीड एकर जागेत पाच कोटीची गुंतवणूक करून सुरू केलेला डेअरी व्यवसाय आज २३ हजार कुटूंबापर्यत पोहंचला असून याउद्योगाने दुध पुरवठादारांना ९०० कोटी रुपये गेल्या पंधरा वर्षात अदा केले आहेत. दुध पुरवठादारांना दर दहा दिवसाला न चुकता पैसा देणारा एकमेव नॅचरल डेअरीचा दुध व्यवसाय असल्याचे बी.बी.ठोंबरे सांगितले. 

    उन्हाळा आला की विविध दुध डेअरीच्या कंपन्या आपल्या कार्यक्षेत्रात सुरू होतात आणि हिवाळा किंवा जास्तीचे दुध असले की त्या बंद होतात. त्यामुळे सर्व दुध उत्पादकांनी अशांच्या भूल थापांना बळी न पडता नॅचरल डेअरीलाच आपले दुध देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये बोलताना श्रीपाद ठोंबरे डेअरी समन्वयक यांनी डेअरीचा पंधरा वर्षातील कामकाजाचा लेखा जोखा सादर केला.तसेच नविन विस्तारीत ३५० केडब्ल्यु सौर ऊर्जा प्रकल्पाची माहितीही विषद केली.

   यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे दुध पुरवठादार, संकलक, वितरक, कर्मचारी व  अधिकारी यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. डेअरीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिवाजी उकरंडे सि. पॅन्ट ऑपरेटर यांना ‘नॅचरल डेअरी आदर्श कामगार पुरस्कार २०२५-२६ देवून सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडूरंग आवाड यांनी केले तर आभार अनिल ठोंबरे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *