कोपरगाव,दि.१०- मागील आठवड्यात टाकळी परीसरात ऊस तोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतांनाच सोमवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे वीसच मिनिटात घटनास्थळी […]
कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोपरगाव,दि.९– आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ऊस लागवडीसाठी ‘ऊस रोप पद्धती’ ही आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञानाधारित पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ.अंकुश चोरमुले (एम.डी.गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज, सांगली) […]
कोपरगाव,दि.८- माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळेच आकर्षण असून या जिल्ह्याचे वैशिष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील मुलांमध्ये जेवढा विनम्रपणा आहे तेवढा विनम्रपणा कुठेही नाही. केंद्र शासनाच्या तसेच राज्याच्या योजना मतदार संघाला मिळाल्या पाहिजे.त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब माणसाला झाला पाहिजे. मागासवर्गीय असेल, अल्पसंख्यांक असेल अशा प्रत्येक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबतची […]
गणेश ओझा,प्रतिनिधी कोपरगाव,दि.७-कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात.त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत.शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
कोपरगाव,दि.६- कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावाच्या परीसरात बुधवार दि.५ रोजी बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी रक्ताला चटावलेल्या त्या नरभक्षक बिबट्याचा ज्याप्रमाणे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबट्याचा बंदोबस्त केला आहे त्याप्रमाणे […]
कोपरगाव,दि.४ कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या १.८० कोटींच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे ०१ कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून ८० लाख रुपये निधीतून गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरीकांच्या विकासाच्या अपेक्षा […]
कोपरगाव,दि.३- झगडे फाटा ते तळेगाव या रस्त्याबरोबरच साईबाबा कॉर्नर ते वैजापूर, शिंगणापूर रेल्वे चौकी ते संवत्सर, कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा एम.डी.आर.८५ व एम.डी.आर.०८ अशा जवळपास ५४ किलोमीटर रस्त्यांचा विकास होणार आहे. हे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे प्रयत्न सुरु असून या रस्त्यांना लवकरच मंजुरी पण मिळणार आहे. हे सर्व रस्ते मीच […]
कोपरगाव,दि.२:- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला असून नागरीकांना पाण्याची अडचण येवू नये यासाठी पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरून घेण्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव शहरासाठी पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या. आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे चार दिवसाआड […]
मुंबई,दि.१- सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष ३०५४ व ३०६८ योजनेतून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३.९० कोटी रक्कमेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रस्ताव शासनदरबारी सादर करून प्रस्ताव सादर केल्यापासून […]
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु कोपरगाव,दि.३१- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. तो वसा आणि वारसा पुढे […]
कोपरगाव,दि.३०-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व शिक्षण सेवेचा वसा निस्वार्थ सेवेतून पुढे चालवितांना सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३ व्या पुण्यस्मरणनिमित्त बुधवार दि.५ रोजी सकाळी ९ वाजता पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.डॉ. विजयकुमार फड (निवृत्त आय.ए.एस.ऑफिसर) यांच्या सुश्राव्य हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव […]
कोपरगाव,दि.२९- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले. दिवाळी सणाचे औचित्य साधत साखर […]
कोपरगाव,दि.२८:- ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक यांचे वतीने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एम.ए.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याने कास्य पदक मिळविले असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक […]
चालू हंगामात तेरा लाख पंचवीस हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२६- मराठवाड्यात नॅचरल उद्योग समुह यावर्षी गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला सर्वाधिक दर देणार असून या हंगामात तेरा लाख पंचवीस हजार मे.टन ऊसाचे गाळप करणार असल्याची माहिती नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली. नॅचरलच्या २४ व्या गाळप हंगामाचा मागील गळीत […]
गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.२६-तालुक्यातील पिंपरवाडी(यशवंतनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच केशरबाई हाडोळे,विजय गायकवाड,कैलास काकड,भूषण हाडोळे रवींद्र गायकवाड उपस्थित होते. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर […]