author

नॅचरल शुगरची पहिली उचल ३००० रुपये देणार- बी.बी.ठोंबरे

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५-नॅचरल  शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी कारखान्याचा २४ वा गळीत हंगाम  नुकताच सुरू झाला असून कारखान्याने सरासरी दररोज सात हजार पाचशे मे.टन याप्रमाणे ऊस गाळप करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.      नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामा मध्ये एकूण तेरा लाख पंचवीस हजार मे.टन […]

पिण्याचे पाणी देणाऱ्यांना साथ द्या-सुनील गंगूले

कोपरगाव,दि.२३:- कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आणि प्रभाग क्र.१४ मधील नगरसेवक उमदेवारांच्या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरीकांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरीकांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांनी विरोधकांच्या पापाचा हिशोबच मांडला. ते म्हणाले की, माजी नगराध्यक्षांनी पत्रकारांसोबत शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तळ्याची पाहणी केली असता त्यांना पिण्याच्या तळ्याच्या शेजारी बेकायदेशीर […]

गोदावरीच्या उजव्या कालव्याला पिण्यासाठी सोडले पाणी

नाशिक,दि.२३- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी कालव्यांना पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून […]

कोपरगाव नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा असेल-रुपाली चाकणकर

कोपरगाव,दि.२२- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे फुले, शाहू , आंबेडकरांचा विचार पुढे घेवून मार्गक्रमण करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेला भरपावसातील उपमुख्यमंत्र्याच्या सभेला कोपरगावकरांनी उपस्थित राहून आ.आशुतोष काळेंना भरभरून प्रेम दिले. पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता आहे. विरोधक किती ही कुरघोड्या करो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे व […]

कोपरगावच्या विकासासाठी आ.आशुतोष काळेंना साथ द्या-खा.सुनील तटकरे

कोपरगाव,दि.२१ :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादांच्या माध्यमातून महायुती शासनाचे  पाठबळ  आ.आशुतोष काळे यांच्या  मागे उभे आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोपरगाव शहराच्या विकास कामांचे प्रस्ताव नगरपरिषदेच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे राज्य सरकारकडे मांडतील त्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे पाठबळ राहील व भविष्यात आ.आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील […]

निळवंडे कालव्याचे लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होणार-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२०- जिरायती भागाच्या १३ गावतील शेतकऱ्यांची मागील पाच दशकांची प्रतीक्षा संपली असून टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून कोपरगाव तालुक्यातील चार गावांचे ९५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असुन वितरीका क्रमांक चार मधून कोपरगाव तालुक्यातील २६८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील एकूण ३६३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळे हा परिसर सुजलाम […]

बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठी महायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१९- कोपरगाव मतदार संघातील येसगाव,टाकळी,खिर्डी गणेश,अंचलगाव व परीसरात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्यात दोन निरपराध व्यक्तींनी आपला जीव गमावला असून वनविभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे परंतु कोपरगाव तालुक्यात अजूनही बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले सुरूच असल्याच्या घटना घडत आहे.त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री […]

मा.आ.कोल्हेंना ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून व्यक्त केला निषेध

कोपरगाव,दि.१८-:- २०१८ साली कोळगाव थडीच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मा.आ.अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ५२.६४ लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचे परस्पर उदघाटन करण्यासाठी मा.आ.स्नेहलता कोल्हे आल्या असता त्यांना कोळगाव थडी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता.त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील सोनारी […]

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक बहुमताने विजयी होतील – आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१७ कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दि.१७ रोजी शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदा दुध संघाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व धर्मिय […]

अखेर नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या शार्प शूटरने टिपले

कोपरगाव,दि.१६- कोपरगाव तालुक्यात दोन निरपराध व्यक्तींचा बळी घेवून नागरिकांवर हल्ला करत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली होती. घडलेल्या घटनांचे गांभीर्य ओळखून व आ.आशुतोष काळेंच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी वन विभागाला त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या […]

वावी येथे श्रीमंत खेळोजी राजेभोसले यांची पुण्यतिथी साजरी

सिन्नर,दि.१६-तालुक्यातील वावी येथे श्रीमंत शहाजी महाराज यांचे बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काका श्रीमंत खेळोजी राजेभोसले यांची पुण्यतिथी संत तुकाराम महाराज मंदिरात आज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर हे होते.      कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत खेळोजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]

दोन दुकाने फोडीत सव्वातीन लाखांची चोरी,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिन्नर,दि.१५तालुक्यातील दापूर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बसस्थानकासमोरील दोन दुकाने फोडून रोख रकमेसह सोने, चांदीचे दागिने मिळून ३ लाख २३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दापूर येथे बसस्थानकासमोर सिन्नर-अकोले रस्त्यालगत शिरीष मल्हारी सांगळे (रा. चापडगाव) यांचे साईराज अॅग्रो एजन्सी नावाचे दुकान असून, त्याशेजारीच अरुण अशोक बोऱ्हाडे […]

कोपरगाव मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांच्या २ कोटीच्या विकास कामांना  प्रशासकीय मान्यता-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१३- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांचा विकास व्हावा व या भागातील नागरीकांना मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यची महायुती शासनाने दखल घेवून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. या २ कोटी निधीतून रस्ते मजबुतीकरण, सांस्कृतिक सभागृह […]

सरपंचांनो तुमच्या दूरदृष्टीपणाला सलाम!  पुर्व भागातील रस्ते होणार काटेरी मुक्त,युद्धपातळीवर काम सुरू

  गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१२-सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसलेआहे.बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे हल्ल्यांची भीतीही वाढली आहे.     बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यांवरील झुडपे हटवावीत,अशी मागणी दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर,मलढोणचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हालवर,राहुल कहांडळ,माळवाडीचे उपसरपंच रविकांत […]

बंद घर फोडून ६ तोळे सोन्याचे दागिने चोरीस

  नाशिक,दि.११-मचिंद्र देवराम लव्हाटे रा.श्रीरामनगर,नांदगाव यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून लोखंडी कपाटातील १,९२,००० किंमतीचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.