author

पराभव दिसत असल्याने पातळी सोडून टीका-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.११- समता पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राजकारण विरहित समाजाची कामे करत आहेत.ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे […]

निवडणुका लोकशाही मार्गाने लढा…

कोपरगाव,दि.१० :- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे काम विरोधक करत आहे. ज्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती. त्यामुळे स्वत:चे उमेदवार सोडून विरोधी सर्व पक्षाच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना न्यायालयाने चपराक दिली. त्यामुळे अजूनच निवडणूक […]

पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार – आ.आशुतोष काळे   

कोपरगाव,दि.९-कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड केली. त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या  अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही दिली. शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेकडून झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड […]

कोपरगावात वाढत्या अवैध धंद्याकडे आ.आशुतोष काळेंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांचे वेधले लक्ष 

नागपूर,दि.७-कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले.      कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू आहेत. या अवैध […]

मिरगांव फाटा गणपती मंदिरात चोरी,चांदीच्या मुकुटसह पादुका कळस लंपास

  गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.७-सिन्नर शिर्डी महामार्गावर मिरंगाव फाट्याजवळील सिद्धिविनायक देवस्थानच्या गणपती मंदिरातून २८ भार वजनाचा चांदीचा मुकुट,दोन चांदीच्या पादुका,१५ किलो वजनाचा पितळी धातूचा कळस,पितळी समई व दानपेटी फोडून रक्कम चोरीला गेल्याची बाब आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास राजेंद्र सखाराम पावले हे नित्यनेमाप्रमाणे पूजा करण्यासाठी गेले असता निदर्शनास आली त्यांनी जवळील ग्रामस्थांना बोलावून घटनेची माहिती दिली […]

दिव्यांग बांधवाकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक दिव्यांगदिन साजरा 

सिन्नर,दि.७-येथून जवळच असलेल्या कहांडळवाडी येथे दिव्यांग बांधवांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकत्र येत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वही,पेन व बिस्किटचे वाटप केले.यावेळी दिव्यांग संघटनेचे वैभव वाघ,राहुल कहांडळ, रवींद्र खरात,गणेश वेलजाळी,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता लोंढे,तालुका उपाध्यक्ष वैभव वेलजाळी, रवी कहांडळ,निखिल भेंडाळे, शुभम भेंडाळे,महेंद्र कहांडळ,योगेश कहांडळ,अमर गुंजाळ,संजय कहांडळ,ग्रामविकास अधिकारी संदीप वाकचौरे,लक्ष्मण भांबरे,शंकर खरात,सुनील पवार आदी […]

कर्मवीर काळे कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’ संपन्न

कोपरगाव,दि.६- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ च्या गाळप हंगामात उसतोडणी करण्यासाठी आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांची ‘उन्नती शिबीर’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक गोळ्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बोरनारे यांनी दिली. ऊस तोडणी कामगारांची व त्यांच्या […]

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा उद्यापासून थरार

कोपरगाव,दि.५- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ६ ते ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणार आहे.स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून गौतम पब्लिक स्कूल सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे.स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील आठ […]

वावी येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात उद्या गुरुचरित्र सोहळा सांगता

सिन्नर,दि.४-तालुक्यातील वावी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून महिला व पुरुष भाविकांकडून गुरुचरित्राचे सामुदायिक पारायण केले जातआहे.सोहळ्यानिमित्त यज्ञ याग करण्यात येत असून त्यामध्ये महिला भाविकांकडून सेवा समर्पित केली जात आहे.  दि.२७ नोव्हेंबर पासून पारायणास प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे यज्ञविधी करण्यात आले.प्रत्येक यज्ञविधी मध्ये […]

वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांकडे मागणी

मुंबई,दि.३ -कोपरगाव मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू असून पोलीस प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने अंकुश लावावा अशी मागणी […]

कोपरगाव नगरपरीषद निवडणूक स्थगित

विकासात खोडा घालणाऱ्या विरोधकांनी निवडणुकीतही खोडा घातला-आ.आशुतोष काळे कोपरगाव नगरपरीषद निवडणूक स्थगित राष्ट्रवादीकडून निषेध कोपरगाव,दि.३०- कोपरगाव शहराचा सुटलेला पाणी प्रश्न व झालेल्या विकासामुळे कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीपोटी कोपरगाव शहराच्या विकासाशी देणं घेणं नसणाऱ्या विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांची उमेदवारी रद्द करावी यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबत सुनावणी होवून कोल्हे गटाच्या […]

गौतम बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार जाहीर

कोपरगाव,दि.२९-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. यामध्ये अजून एका पुरस्काराची भर पडली असून जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल नामांकित असलेल्या संस्थेकडून गौतम बँकेला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड […]

कोपरगावकरांच्या काळजीपोटी आशुतोषची लाडकी दादागिरी कायम सहन करणार-ना.अजित पवार

कोपरगाव,दि.२८– मागील महिन्यात कोपरगावात बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या त्यावेळी नागरिकांनी रस्ता रोको केला होता तेव्हा आशुतोषने मला फोन केला, मी महत्वाच्या मिटिंग मध्ये होतो मला पुरवणी मागण्या सादर करायच्या होत्या मी माझ्या पी.ए.ला सांगितले मी आता नाही मिटिंग संपल्यावर बोलतो. त्यावेळी आशुतोषने सांगितले, दादा मिटिंगमध्ये असले तरी मला आत्ताच बोलायचे आहे. मी ऐकणार […]

 उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार यांची उद्या जाहीर सभा

कोपरगाव,दि.२७:- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि.२८ रोजी दुपारी २.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीत पवार यांची जाहीर सभा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी […]

कोपरगावला हायटेक करणार-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२६-  २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान मी कोपरगावकरांना तुमच्या हक्काचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते तो शब्द मी पुर्ण केला असला तरी कोपरगावला नियमित पाणी देण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे ज्याप्रमाणे कोपरगावचा पाणी प्रश्न सुटला त्याप्रमाणे इतरही विकासाचे प्रश्न येत्या काळात पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विकासाला विरोध करणाऱ्यांना निवडून […]