author

आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे

वावी(वार्ताहर)– गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वाजे पर्यंत पाटबंधारे […]

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालआनंद मेळावा उत्साहात साजरा

वावी,दि.२३-येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विजय काटे यांच्या करण्यात आले.मेळाव्यात खाऊ गल्ली,खेळ गल्ली व भाजीपाला गल्ली अशी रूपरेषा तयार करून विद्यार्थ्यांना आर्थिक सामाजिक जीवनातील कौशल्यवाढीची माहिती देण्यात आली.    यावेळी बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.बदली झालेल्या शिक्षकवर्गाकडून शाळेस आधुनिक माईक,स्पीकर भेट […]

कोपरगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांना शहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :आ.आशुतोष काळे  कोपरगाव,दि.२२:- २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून येवून नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार विजयराव वहाडणे निवडून आले होते. त्यावेळी विकासाला पाठिंबा देण्यासाठी निवडून येताच वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याही निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ७ वरून […]

वक्तृत्व म्हणजे श्रोत्यांच्या मनाशी संवाद- अरुण चंद्रे

कोपरगाव,दि.२१- प्रभावी वक्तृत्वात वक्ता आणि श्रोते यांच्यातील भावनिक, बौद्धिक व सामाजिक नाते दृढ होते. विचारांची स्पष्टता, विषयाची खोली आणि मांडणीतील प्रामाणिकपणा यांमुळे श्रोते केवळ ऐकत नाहीत, तर विचार करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणेच नव्हे तर तो श्रोत्यांच्या मनाशी केलेला एक संवाद असतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे […]

नूतन विद्यालयाचा रस्सीखेच स्पर्धेत बोलबाला

गणेश ओझा,प्रतिनिधी नाशिक,दि.२०-के.के.वाघ स्मृतीचषक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन भाऊसाहेबनगर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.स्पर्धेत नूतन विद्यालय व ॲड रावसाहेब शिंदे ज्युनिअर कॉलेज वावी विद्यालयाच्या १७ वर्ष व १९ वर्ष मुलांच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांकपटकावला.संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून मिळाले.     १७ वर्ष मुलांच्या संघात कर्णधार […]

स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर कोण घेवून गेले?कोपरगावकरांनो एकदा स्मार्ट सिटीच्या जागेचे उतारे तपासा

कोपरगाव,दि.१९- जोपर्यंत कोपरगावकर पाण्यासाठी वणवण करतील तोपर्यंत आपल्या राजकीय साम्राज्याला धक्काच लागू शकत नाही ह्या गैरसमजातून विरोधकांनी २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची सभा घेवून कोपरगावकरांना पाणी देणार असल्याचे वदवून घेतले होते. मात्र स्वत: आमदार, राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार असतांनाही कोपरगावकरांना ते पाणी देवू शकले नाही हि वस्तुस्थिती आहे. मात्र चांगले झाले तर आम्ही केले […]

कहांडळवाडी शिवारात बिबट्या जेरबंद

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१८-कहांडळवाडी चिंचोलीगुरव रस्त्यावर भाऊसाहेब भाऊराव गुंजाळ यांच्या गट क्र १४१/१/१ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून ग्रामस्थांनी बिबट्या वनविभागाच्या स्वाधीन केला आहे.परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून वनविभागाने पिंजऱ्याची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नूतन विद्यालयाच्या रस्सीखेच संघाची राज्यस्तरीयपातळीवर झेप   

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी                                                     सिन्नर,दि.१७-तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालय व अँड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने रस्सीखेच स्पर्धेत विभागीय पातळीवर घवघवीत यश संपादीत करीत राज्यस्तरावर स्पर्धेसाठी नांदेड येथे […]

युवराज गवळी यांना उपक्रमशील गणित विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रधान

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी राहाता,दि.१७-राहाता तालुका गणित, विज्ञान,कला अध्यापक संघटना तसेच राहाता पंचायत समिती यांव्दारे दिला जाणारा यावर्षीचा तालुका स्तरीय कृतिशील,उपक्रमशील गणित विज्ञान शिक्षक हा पुरस्कार युवराज गवळी यांना देण्यात आला.     राजुरी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विदयालयात पार पडलेल्या ५३ व्यागणित, विज्ञान प्रदर्शनात प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते […]

शेतकऱ्यांना एआय सारख्या नविन तंत्रज्ञानाचा फायदा देणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना-जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी राजकुमार मोरे

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१७-कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना एआय सारख्या नविन तंत्रज्ञानाचा फायदा देणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी राजकुमार मोरे यांनी केले.     नॅचरल उद्योग समूहाच्या रांजणीच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान (एआय) चा वापर करणेसाठी पहिल्या हवामान केंद्राची उभारणी पुर्ण करून त्याचा प्रारंभ जिल्हा अधिक्षक कृषी […]

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा आमचा निर्धार

कोपरगाव,दि.१६- कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना भरभरून मतांनी निवडून दिले.त्यातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरदेखील इतर विकसित शहरांच्या बरोबरीने घेवून जायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या. आपल्या प्रभागाचा आणि आपल्या कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांना आ.आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. […]

आरोपींना तातडीने शासन करा

कोपरगाव,दि.१५ :- समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला चार दिवसांपूर्वी दिले आहेत परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.आज सोमवार दि.१५ रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी […]

चार वर्षात कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१४:- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मुलभूत सर्व विकासकामे करणार आहे. होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेला कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतो अशी साद आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना घातली आहे. कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ […]

विकासासाठी सत्ता द्या-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१३-कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या विकासाचे कोणतेच मुलभूत प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.कोपरगाव शहराला समृद्ध आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरीषदेची सत्ता द्या, विकासाच्या राहिलेल्या समस्या संपुष्टात आणल्याशिवाय राहणार असा विश्वास आ.आशुतोष काळे […]

१.५० कोटी निधीतून श्री राघवेश्वर महादेव मंदिराचे विविध विकासकामे सुरु : आ. आशुतोष काळे

  कोपरगाव,दि.१२- कोपरगाव तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक असलेल्या तसेच कुंभारी व पंचक्रोशीतील भाविकांचे अखंड श्रद्धास्थान असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाकडून पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विकास कामे सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभक्तांच्या सोयी सुविधेत वाढ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदार […]