author

युरिया कंपनी प्रतिनिधींना आ.आशुतोष काळेंनी खडसावले

कोपरगाव,दि.८-कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका महिन्यात २ हजार टन […]

स्कार्पिओ व कार अपघातात चार ठार

नाशिक,दि.७-गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठ कडून येणाऱ्या  कारला  समोरून धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले तर स्कार्पिओ वाहनातील एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गोदाकाठ महोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ

कोपरगाव,दि.६- महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा महिला बचत गटांचा महाउत्सव म्हणून ‘गोदाकाठ महोत्सव’ राज्यात ओळखला जातो. हा ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.९ पासून मोठ्या उत्साहात […]

साडे तीन वर्षात उर्वरित विकास कामे पूर्ण होवून कोळपेवाडीसह संपूर्ण मतदार संघाचा पूर्ण कायापालट होईल-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.५- विकासाचा अनुशेष भरून काढतांना मागील सहा वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणल्यामुळे वर्षानुवर्षे ज्या रस्त्यांनी कधी खडी आणि डांबर बघितले नव्हते त्या रस्त्यांना मंजुरी मिळवून ते रस्ते डांबरी केले आहे.कोळपेवाडी आणि सुरेगाव परिसरातील अनेक रस्ते आणि विकासकामे मंजूर असून निधी उपलब्ध होताच या विकास कामांना प्रारंभ  होईल. जनतेला अपेक्षित असलेली बहुतांश विकास […]

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कोपरगाव,दि.३-महान समाजसुधारिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या आणि थोर समाज सुधारक क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (दि.०३) रोजी कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळी बोर्डिंग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देतांना सांगितले की, ज्या काळात चूल आणि मुल हीच स्त्रीची व्याख्या होती, महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेतले आणि स्री […]

सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे उर्वरित काम लवकर पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या सूचना  

कोपरगाव,दि.२:- कोपरगाव मतदार संघातील नागरीकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या. सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंतच्या महामार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला असून ७५२ जी च्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते […]

वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१-कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. वेस सोयेगाव येथे १0 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.०१) रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत […]

कोपरगावमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा-राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विरेन बोरावके

कोपरगांव-मकरसंक्रांती सण काही दिवसांवर आला असून कोपरगाव शहरात नागरिकांची खरेदीची लगबग चालू असल्याने बाजारपेठ फुललेली असताना नायलॉन मांजामुळे एक लहान मुलगा आणि दोन पुरुष असे तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आकाशात उडणाऱ्या पतंगा सोबतच नायलॉन मांजाची टांगती तलावर नागरिकांच्या मानेवर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी […]

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कोपरगाव,दि.३०- राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे पार पडल्या होत्या त्यास्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात येवून  महाराष्ट्राच्या संघामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड आली होती.राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश टिकमगड येथे पार पडल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावली अशी माहिती […]

आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे

        कोपरगाव,दि.२९ – गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी […]

लौकी ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.आशुतोष काळेंनी केला पूर्ण,रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार

कोपरगाव,दि.२८- कोपरगाव मतदार संघातील लौकी गावातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे काम विविध अडचणींमुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेले होते परंतु या रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी दूरू करून रस्त्यासाठी निधीही देवू हा शब्द आ.आशुतोष काळे यांनी लौकी ग्रामस्थांना दिला होता. तो शब्द पूर्ण करून त्यांनी पूर्ण करून या रस्त्याच्या सर्व […]

गौतम पब्लिक स्कूलचा तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक

कोपरगाव,दि.२७/ कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन दि.२२ ते २४ डिसेंबर  कालावधीत के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख […]

नॅचरल उद्योग समूहाला व्हीएसआय मार्फत सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२६-वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचेवतीने देण्यात येणारा साल सन-२०२३-२४ चा कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.या कारखान्यास जाहीर करण्यात आला आहे.नॅचरल उद्योग समुहाने साखर उत्पादनाबरोबरच आर्थिक शिस्तीचे अनेक विक्रम प्रस्तापित केलेले आहेत.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या नियोजनातून नॅचरल उद्योगसमुहाने शेतकरी व सर्व सामान्य […]

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह १४ कोटीच्या खर्च कशासाठी??

गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.२५-राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय राज्यमार्ग क्र १६० च्या डिजाईनमध्ये पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी १४ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असे २ भक्तनिवास खोपडी व पाथरे येथे बांधले खरे गेली परंतु ४ वर्षापासून भक्तनिवास भक्तासाठी वेळोवळी मागणी करूनही खुले न केल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नाशिक कार्यालयाकडून […]

व्हीएसआय कडून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला मध्य विभागातून प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

            कोपरगाव,दि.२४-साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच तर्फे राज्यामध्ये दरवर्षी  चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार तसेच राज्यामध्ये ऊसाचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते. गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाकरीता मध्य विभागातुन तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार हा साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर […]