author

पिंपरवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.२६-तालुक्यातील पिंपरवाडी(यशवंतनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच केशरबाई हाडोळे,विजय गायकवाड,कैलास काकड,भूषण हाडोळे रवींद्र गायकवाड उपस्थित होते.     सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर […]

 ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग उद्या कोपरगावात

कोपरगाव,दि.२६- कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी ६ वाजता कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे.  या बहुचर्चित कार्यक्रमासाठी ‘अगं बाई सासूबाई फेम’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित राहणार असून समवेत ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग, रील स्टार राशी […]

धामोरीतील गोई नदीवरील पुलाचा अनेक दशकांपासूनचा प्रश्न कायमचा सुटल्याचे समाधान -आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२५–कोपरगाव तालुक्याच्या धामोरी येथील गोई नदीवरील पूल हा धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा पूल होता. परंतु पावसाळ्यात थोडा जास्त पाऊस झाला की, हा पूल पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत होत होते. त्यामुळे हा पूल व्हावा हि धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांची मागणी होती. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची […]

गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२४- गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल ३००० रुपये द्यावी आणि अंतिम दर ३५०० रुपये द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  मोटारसायकल रॅली काढून सहा गुळ पावडर कारखाना व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा युवा आघाडी संघटनेचे अध्यक्ष विष्णूदास काळे यांनी दिली. यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात […]

नॅचरल उद्योग समूहाचा २६ ऑक्टोबरला गळीत हंगामाचा शुभारंभ

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२४-नॅचरल उद्योग समूहाच्या साल सन २०२५-२६ या २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी दि.२६ होणार आहे.या गळीत हंगामाचा प्रारंभ सन २०२४-२५ या हंगामात कारखान्यास सर्वाधीक ऊस पुरवठा करणारे लोहटा पूर्व येथील शेतकरी प्रदिप रामदास खोसे आणि सौ.अर्चना प्रदिप खोसे या दाम्पत्याच्या हस्ते गव्हाण पूजन करुन गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात येणार आहे.नॅचरल […]

अतिवृष्टीची तालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई

  मुंबई,दि.२३ :- राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त […]

घरफोडी करीत सोने व ७५ हजार रोख रक्कमेची चोरी

नाशिक,दि.२२-वैभव तुकाराम सांगळे रा.खळवाडे यांच्या घरातून १ तोळा सोन्याचे दागिने व ७५ हजार रोख रक्कमेची चोरी झाली असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदावरी नदीवर कोपरगाव तालुक्यात साकारणार आणखी एक सेतू

कोपरगाव,दि.२१- एम.डी.आर असो किंवा नसो ग्रामीण मार्ग असो किंवा नसो ज्या ठिकाणी नागरिकांची पुलाची मागणी आहे ज्या ठिकाणी पूल करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी पूल उभारण्यास मंजुरी देण्याचा महत्वाचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. मा.आ.अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारले त्यामुळे दळणवळण वाढले त्याचा फायदा अनेक गावांना झाला.धारणगाव-कुंभारी पुलामुळे संपूर्ण पश्चिम […]

राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कु.ईश्वरी निंबाळकरची चमकदार कामगिरी

कोपरगाव,दि. केंद्र सरकार आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.ईश्वरी विठ्ठल निंबाळकर हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. हरियाणा राज्यातील हिसार येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर पार […]

नॅचरल उद्योग समूहाच्या कर्मचा-यांना २५ टक्के बोनस

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१८-साईनगर रांजणी ता कळंब येथील नॅचरल उद्योग समूहाने युनिटमधील सर्व कर्मचा-यांना दिवाळी सण आनंदाने साजरा करता यावा म्हणून बोनस कायद्यानुसार ८.३३ टक्के बोनस व चालु गळीत हंगामात निर्धारीत उद्दीष्ट पुर्ण करणेसाठी १६.६७ टक्के बक्षीस जाहीर केले असून बोनस व बक्षीस मिळून एकूण २५ टक्के रक्कम कर्मचा-यांचे संबंधीत श्री साई पतसंस्थेचे खात्यामध्ये जमा […]

शिलाई मशीन प्रशिक्षण,महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विधायक पाऊल-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१७:- प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून आजच्या समाजरचनेत महिलांचे योगदान केवळ चूल आणि मुल यापुरतेच मर्यादित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे ही काळाची गरजआहे. या दृष्टीकोनातून महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण हा उपक्रम हाती घेतला.हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण पुरवण्यापुरता मर्यादित नाही, तर महिलांच्या […]

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातील प्रथम पुरस्कार

नाशिक,दि.१६- कोळपेवाडी-सुरेगाव परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना गरजेच्या वेळी आर्थिक बळ देण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्थापन केलेल्या व मा.आ.अशोकराव काळे तसेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब ना.स.पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातील प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागाच्या वतीने […]

जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल अजिंक्य

विभागीय स्पर्धेत करणार जिल्ह्याचे नेतृत्व कोपरगाव,दि.१५- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.  गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य […]

वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गॅस रिफिलींगवर छापा

सिन्नर,दि.१४-वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडी गावचे शिवारात काही संशयीत इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरीता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींग करत असल्याची बातमी स्थागुशाचे पथकास मिळाली होती.     त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, संशयीत इसम नामे १) रामदास सुकदेव केदार, वय ५०, रा. […]