author

शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबिराला महिलांचा प्रचंड  प्रतिसाद

कोपरगाव,दि.१३- शहरातील महिला भगिनी पारंपारिक कौशल्यासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करत व्यावसायिक क्षेत्रात भक्कमपणे उभ्या आहेत. ग्रामीण भागातील महिलां देखील रोजगाराच्या क्षेत्रात कुठेही मागे राहणार नाही. याकरीता त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी आ.आशुतोष काळे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्याच पुढाकारातून आणि सहकार्याने महिलांसाठी शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षण […]

आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत कोल्हे गटाच्या १७ कुटुंबाचा एकाचवेळी काळे गटात प्रवेश

लौकीत कोल्हे गटाला मोठे भगदाड कोपरगाव,दि.१२-मागील २५ वर्ष चुकीच्या मार्गावर होतो परंतु आम्हाला आता चांगली बुद्धी सुचली. मदतीच्या अपेक्षेने ज्यावेळी सुदामा आपला मित्र भगवान श्री कृष्णाकडे गेले होते त्यावेळी ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याला भरभरून दिले तसाच काहीसा अनुभव आम्हाला आ.आशुतोष काळे यांच्या बाबतीत आला. ज्या रस्त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो जो आजपर्यंत कधीच झाला नव्हता त्यावेळी […]

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतमच्या मुलींचा विजय

कोपरगाव,दि.११-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय हॉलीबॉल स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखून हि स्पर्धा जिंकली.  स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात नेवासा तालुका संघाचा सरळ सेटमध्ये २५-१२, २५-१६ असा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला. […]

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वावी विद्यालयाचे सुयश

सिन्नर,दि.९-क्रीड़ा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीड़ा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या.त्यातील विविध क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालय वावीच्या खेळाडूंनी सुयश मिळवले.      १४ वर्ष वयोगट मुली गटातील ४०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक साक्षी गोरक्षनाथ काळे हिने मिळवीत जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान पटकावले.१७ वर्ष वयोगट मुली […]

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ विजेता

कोपरगाव,दि.९- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर दि.६  ते दि.९ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जिया शेख, शाळेचे प्राचार्य नूर शेख आदी […]

‘विकासाचा महामेरू’गौरव ग्रंथातून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समाजाभिमुख कार्याचा अचूक वेध- ना.छगनराव भुजबळ

आ.आशुतोष काळेंच्या संकल्पनेतील गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न मुंबई,दि.८-उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती, निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीपासून ते प्रशासनातील कुशलतेपर्यंत, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचे सुसंगत आणि वास्तवदर्शी मांडणी करतांना या सर्व कार्याचा अचूक वेध तरुण, सुसंस्कृत व सुशिक्षित […]

कोपरगावात शुक्रवारपासून ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव – सौ. पुष्पाताई काळे

कोपरगाव,दि.७- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू अल्प दरात एकाच जागेवर खरेदी करण्याची संधी  ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरीकांचा आवडता हा ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव शुक्रवार दि.१० पासून सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली. दिवाळी […]

केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शाह यांचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

कोपरगाव,दि.५- केंद्रीय गृहमंत्री तथा पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना.अमित शाह यांचे रविवार दि.५ रोजी लोणी व कोपरगाव येथे विविध कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.   कार्यक्रमांसाठी ना.अमित शाह यांचे समवेत पूर्व संध्येला  राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, […]

तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२ मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाला असला तरी पुन्हा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. महायुती शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यावेळीही राहणार आहे.मात्र यामध्ये तुमची भूमिका अत्यंत महत्वाची असून तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने […]

कोपरगावच्या विकासाचे अजून एक वचन पूर्ण होणार -आ.आशुतोष काळे

कोपरगावच्या क्रीडा संकुलाला मान्यता कोपरगाव,दि.१-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेला दिलेल्या एकेक वचनांची  पूर्तता करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी अजून एक वचन पूर्ण करण्यात यश मिळविले असून मागील चार वर्षापासून कोपरगाव शहरात अद्यावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. आशुतोष काळे […]

नॅचरल उद्योग समूहाला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

     जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.३०-नॅचरल उद्योग समूहाला आर्थिक वर्षात ५५ कोटी ९ लाख रुपये नफा झाला असून कारखाना सभासदांना २५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी बी ठोंबरे यांनी दिली.       सभासदाना कारखाना उभारणी पासून सातत्याने लाभांश देणारा देशांतील पहिला साखर उद्योग आहे.साखर कारखाना युनीट तोटयात जावूनही […]

कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आ.आशुतोष काळेंचे अजून एक पाऊल पुढे

कोपरगाव,दि.२९- कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहराच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव सबस्टेशनवरचा भार कमी करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. आता त्यापुढे जावून कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबाबत नुकतीच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत कोपरगाव शहरात महावितरणचे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. […]

कोपरगाव मंडलात ६५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस

भरपावसात आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर कोपरगाव,दि.२८:- कोपरगाव मतदार संघात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले.काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका,तूर,भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती […]

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत नूतन विद्यालय वावी संघ उपविजेता

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.२७-क्रीडा व युवक संचालनलय,जिल्हा क्रीड़ा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा विभागीय क्रीड़ा संकुल येथे पार पडल्या.      १९ वर्ष वयोगट मुले व मुलींचे एकूण २५ संघानी स्पर्धेत  सहभाग नोंदवला त्यात स्पर्धेत नुतन विद्यालय वावी संघाला उपविजेते पद मिळाले.संघात राणी खाटेकर,तेजल खरात, अनुष्का ढमाले,आराध्या जम्बूकर,श्रद्धा घोटेकर,दिक्षा कांदळकर,कोमल सरोदे,प्रतिक्षा […]

सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

कोपरगाव,दि.२६– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळवून महाविद्यालयाची मान उंचावली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी गाढेची प्रजासत्ताक दिन पूर्व संचालन निवड चाचणी शिबिरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने निवड […]