author

नॅचरल शुगरला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५- गाळप हंगाम २०२४-२५ मधील साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी कारखान्याला दि डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या वतीने राज्यातील सर्वाेत्कृष्ट साखर कारखाना’ हया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते पुणे येथे करण्यात आले.        यावेळी सहकार […]

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे

कोपरगाव,दि.२४- भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली तर नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक आपल्या नावावर करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यावरून असे दिसून येते की, गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढली असून भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढला आहे.हा दबदबा असाच टिकून ठेवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय […]

वावी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी,उद्योजक राजेंद्र कापसे यांच्याकडून विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२३-येथील नूतन विद्यालय व अँड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.     कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर गावांतून प्रभातफेरी  काढण्यात आली.त्यात लेझीम पथक,टिपऱ्या पथक,झांजपथक त्याचप्रमाणे  विविध पेहराव असणारे विद्यार्थी,समतेचा संदेश देणारे फलक,पर्यावरण जनजागृती फलक घेऊन विद्यार्थी […]

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

कोपरगाव,दि.२२-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.   रोजच्या […]

श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून मोटारसायकल चोरीला

  नाशिक,दि.२१-किरण त्रंबक पानवगव्हाणे यांची युनिकॉर्न मोटारसायकल क्र.एम.एच १५  सी.झेड ७९६९ ची निफाड येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून चोरी झाली असून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाकडे पूणे विभागाचे नेतृत्व

कोपरगाव,दि.२०- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने पीसीएमसी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नेहरू हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करतांना नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले.स्पर्धेचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट पेट्रिक्स स्कूल,  पुणे (पूणे, शहर) यांच्यात झाला. या सामन्यात आपल्या […]

गौतम बँकेला दुहेरी राष्ट्रीय मान

कोपरगाव,दि.१९- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. परंतु यापुढे जावून गौतम बँकेने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराला गवसणी घातली आहे ती देखील एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची अतुलनीय कामगिरी गौतम बँकेने करून दाखविली आहे. देश पातळीवरील […]

कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – सौ. पुष्पाताई काळे

कोपरगाव,दि.१८- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार दि.२२ सप्टेंबर ते बुधवार दि.१ ऑक्टोबरपर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली.   दरवर्षी महिला भगिनींना आतुरता असणारा “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव […]

नवीन पाच बसचे लोकार्पण

कोपरगाव,दि.१७-कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉंक्रीटिकरण उखडले जावून खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची हि अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बसस्थानकाच्या आगारात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.लवकरात निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून निधी उपलब्ध होताच संपूर्ण बस […]

सिन्नर-शेतातून २ लाख रुपयांचे डाळिंब चोरीला

  सिन्नर,दि.१६-तालुक्यातील किर्तांगळी शिवारातील रावसाहेब शंकर चव्हाणके यांच्या शेतातील २० किलो वजनाचे १०० कॅरेट असे २ लाख किंमतीचे डाळिंब चोरी गेल्याची घटना घडली असून एम.आय.डी सी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०२६ मधील फेब्रुवारी-मार्चमध्ये अधिक लगीनघाई असणार-डॉ.भूषण संजय रत्नाकर गुरुजी

  नाशिक,दि.१५- सन २०२५ मध्ये लग्नसराईसाठी तुरळक मुहूर्त असून शुक्र ग्रहाचा अस्त काळ १४ डिसेंबर  २०२५ ला सुरु होत असून २० जाने २०२६ पर्यंत हा कालावधी असणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ.भूषण संजय रत्नाकर गुरुजी यांनी दिली.          १६ डिसेंबर २०२५ नंतर २० जानेवारी २०२६ पर्यंत पौष महिना असल्याने विवाहाचे शास्त्रसंमत मुहूर्त नाहीत.दिवाळी […]

देशाचा नकाशा साकारत विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश

  कोपरगाव,दि.१५:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशनसोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी हिंदी दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची बैठक व्यवस्था शाळेच्या भव्य प्रांगणात आपल्या भारत देशाच्या नकाशाची भव्य  प्रतिकृती व हिंदी नामफलक साकारत करण्यात आली होती.         संपूर्ण राज्यात गौतम पब्लिक […]

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पोलिसांकडून आवाहन

सिन्नर,दि.१४-सिन्नर शहर, औद्योगिक क्षेत्र, तसेच ग्रामीण भागात इलेक्ट्रिक,इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी येणाऱ्या भामट्यांकडून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.     आपल्या परिसरात, गावात इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, गॅस शेगड्या किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करण्यासाठी बाहेरगावाहून काही लोक येत आहेत. ग्रामस्थांनी त्यांच्याकडील शेगडी किंवा वस्तू विकत घेतल्यानंतर हे लोक त्यांना […]

एस.टी बसमध्ये चढत असताना सिन्नर बसस्थानकात मंगळसूत्र चोरीला

  सिन्नर,दि.१३-दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सिन्नर ते वडझीरे एस.टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत सारिका लक्ष्मण ठोंबरे यांच्या पिशवीमधील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन साई मल्टी स्टेट को आँपरेटीव्ह सोसायटीला ७ कोटी ३९ लाख रुपये नफा,गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि दुर्धर आजारी रुग्णांना मदत

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१२-कळंब तालुक्यातील राजंणी येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन साई मल्टी स्टेट कोआँपरेटीव्ह सोसायटीला यावर्षी ७ कोटी ३९ लाख ६४ हजार रुपये नफा झाला असून सभासदाना आठरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष कृषी रत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली.     एन साई मल्टी स्टेट को आँपरेटीव्ह सोसायटीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा […]