गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.११-क्रीडा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा एस.एल.एम इंग्लिश मीडियम स्कूल सोनारी येथे नुकत्याच पार पडल्या. स्पर्धा १४ वर्षे,१७ वर्षे, १९ वर्षे मुली या वयोगटात घेण्यात आली त्यात ७५ शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला.स्पर्धेत वावी येथील नूतन विद्यालयाचे १४ वर्षे व […]
सिन्नर,दि.१०-येथील जयेश माणिकलाल नाईक रा. शिवाजीनगर यांचा फेसबुक व whatsapp वर विश्वास संपादन करून वेबसाईटवर पैसे गुंतविण्यास सांगून विविध बँक खात्यातून ६४,८०,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.९-तालुक्यातील वावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब पुंजाजी खाटेकर यांची निवड करण्यात आली.सदस्यांना पदाची संधी मिळावी यासाठी व्हा.चेअरमन रेखा कैलास काळोखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोसायटी कार्यालयात चेअरमन संदीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. अर्ज दाखल करण्याचा निर्धारित वेळेत बाळासाहेब पुंजाजी खाटेकर यांचा एकमेव अर्ज […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.८-क्रीडा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धाचे आयोजन गोपाळ विद्यालय पिंपळे येथे करण्यात आले होते.स्पर्धेत १४ वर्षे,१७ वर्षे व १९ वर्षे मुली या वयोगटानुसार स्पर्धा पार पडल्या त्यात ७० शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला. वावी येथील नूतन विद्यालयाचे १४ वर्षे व १९ […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.८-पंधरा दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मनेगाव, दोडी, दुशिंगवाडी,धोंडवीरनगर तसेच राहता तालुक्यातील देर्डे को-हाळे परिसरात मध्यरात्रीचे सुमारास शेतवस्त्यांवर मुक्कामी असलेले मेंढपाळ यांच्या सुमारे ९० मेंढया असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी लबाडीचे इराद्याचे चोरी करून चोरून नेलेबाबत सिन्नर,वावी तसेच राहता पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे एकुण ४ गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर घटनांबाबत मेंढपाळ कुंटूंबीयांमध्ये […]
सिन्नर,दि.७)-पंधरा दिवसापुर्वी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा परिसरात दुचाकीवरून कोपरगाव कडे जाणाऱ्या एकाच अडवून तिघा जणांनी मारहाण केली होती.या घटनेत त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये रोख रक्कम,दुचाकीची चावी घेऊन हल्लेखोर पसार झाले होते.वावी पोलिसांनी या प्रकरणात तिघा जणांना अटक केली आहे. सुधाकर वक्ते वय ३५ हे वावी येथे पॅथॉलॉजिकल लॅब चालवतात. मारहाणीची घटना […]
किरण आवारे,विशेष प्रतिनिधी नाशिक,दि.७ सिन्नर तालुक्यातील पांगरी बु. गावचे शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात लाल मक्याची लागवड केली आहे. दोन एकर क्षेत्रावर केलेल्या या लागवडीला चांगले यश आले असून स्थानिक पातळीवर या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगाची मोठी चर्चा सुरू आहे.या पिकातून साधारण ६० क्विंटल उत्पादन मिळेल, असा अंदाज वाळुंज यांनी वर्तवला […]
सिन्नर,दि.६-अरुणा अनिल चांडक रा.भगूर यांच्या दोन्ही हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.५-घरच्या घरी पिकांना लागणाऱ्या निविष्ठा तयार करून शेतीमधील रासायनिक खतांचा खर्च कमी करावा असे आवाहन विज्ञान संत अंकूश पाटील सांगली यांनी केले. नॅचरल उद्योग समुहाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शेतीतील रासायनिक खताचा खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढवणेसाठी घरच्या घरी निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात […]
कोपरगाव,दि.४ :- पावसाळ्यात तांत्रिक बिघाड होतात, त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. जर कधी रात्रीची वेळ असेल तर अशा परिस्थितीत शहरी भाग असो वा ग्रामीण भाग त्या भागातील नागरीकांना खंडीत वीजपुरवठा कधी सुरु होईल याची नागरीक आतुरतेने वात पाहत असतात. अशा वेळी विद्युत विभागाचे तांत्रिक कामगार वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून वीज सेवा पूर्ववत करतात. त्यामुळे तांत्रिक कामगार महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा […]
सिन्नर,दि.३-तालुक्यातील वावी व परिसरात सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी,अशक्तपणा अशा लक्षणाचे हजारों रुग्ण असून त्यात झपाट्याने वाढ होत असताना आरोग्य विभाग मात्र सुस्तावल्याचे पहावयास मिळत आहे. मागील महिन्यात सुरू असलेला पाऊस त्यांनतर पडलेले कडक उन्ह अन उन्ह पावसाळा सुरू असलेला खेळ त्यामुळे वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी,अशक्तपणा,शरीरातील पेशी कमी होणे यालक्षणाची हजारो रुग्ण परिसरात असून खाजगी दवाखान्यात रुग्णांची […]
सिन्नर,दि.३-वावी ते घोटेवाडी रस्त्यावर समृद्धी पुलाजवळ आज पहाटेच्या सुमारास शेकडो मृत कोंबड्या रस्त्याच्याकडेला फेकून देण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून अशाच प्रकार दोन दिवसांपूर्वी घडलेला असताना परत तोच प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून त्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोपरगाव,दि.२-कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची शासकीय कामात अडवणूक केली जात असून काही शासकीय अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा प्रकार गंभीर असून सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही शासकीय कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. शासनाच्या कल्याणकारी योजना सर्व […]
नाशिक,दि.१-सोपान रामदास पवार रा.मुखेड यांच्या शेडमधून दोन शेळ्या व दोन बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.३१- धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक देवस्थान असून लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहेत. यात्रा उत्सव प्रसंगी दरवर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा होवून तालुक्यातील चार देवस्थानांना ५० लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. या विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता […]