तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वावी विद्यालयाचा डंका

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.८-क्रीडा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धाचे आयोजन गोपाळ विद्यालय पिंपळे येथे करण्यात आले होते.स्पर्धेत १४ वर्षे,१७ वर्षे व १९ वर्षे मुली या वयोगटानुसार स्पर्धा पार पडल्या त्यात ७० शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला.
     वावी येथील नूतन विद्यालयाचे १४ वर्षे व १९ वर्षीय मुलीच्या संघानी सहभाग घेतला त्यात १९ वर्षे मुलींच्या संघाने विजेतेपद  पटकवले असून नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे.
    खेळाडूंना विद्यालयाचे क्रीड़ा शिक्षक विजय शिंदे,शिवाजी  सरोदे,निवृती आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
   
    विजयी खेळाडूचे व क्रीडाशिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य मखरे,उपमुख्याध्यापक सोनवणे,पर्यवेक्षक दिगे,स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन रामनाथ कर्पे,सदस्य,पालक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *