author

वावी येथे ‘सक्षम तू’ उपक्रमातून स्वरक्षणाचे धडे

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२२-तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींसाठी ‘सक्षम तू’ कार्यक्रमाचे आयोजन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ग्रामीण सरचिटणीस हेमलता सुनील कासार यांनी केले होते.    यावेळी उपनिरीक्षक प्रमोद सरोवार  यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे,भारतीय न्याय संहिताचे कलमे,कायदेविषयक माहिती,पोक्सो,पोलिसांचे टोल फ्री संपर्क क्रमांक याबाबत माहिती दिली. […]

गौतम पब्लिक स्कूलमध्ये सौ. चैतालीताई काळेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा  

कोपरगाव,दि.२१-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  सकाळच्या सत्रात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मेस विभाग परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविली व सायंकाळी इंटर हाऊसेस फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून अनोख्या पद्धतीने सचिव […]

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या इमारतींना दोन कोटी निधी मंजुर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२०- ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष याप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.     शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सिन्नर येथे २४ जुलैला चक्काजाम आंदोलन

सिन्नर,दि.१९-सरकारने निवडणुकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही त्यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी,दिव्यांगाचे नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा.आ.बच्चु कडू यांनी दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी उपोषण,आंदोलन, पायी यात्रा काढल्या असून २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.      नाशिक पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ  २४ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वेळेत प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम […]

पाणी पुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाका

कोपरगाव,दि.१८- जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगांव मतदार संघातील धारणगाव, सुरेगाव, शिंगणापूर पाणी पुरवठा योजना,पिंपळवाडी-नपावाडी,मळेगाव थडी,मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडवणाऱ्या त्या दोन कंपन्यांना आ.आशुतोष काळे यांनी दणका दिला आहे. सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.मेहसाणा […]

राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

कोपरगाव,दि.१७- कोपरगाव मतदार संघातील अत्यंत महत्वाचा व मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या राज्य मार्ग ६५ अर्थात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या दुरुतीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधत लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. आ.आशुतोष काळे म्हणाले की, राज्यमार्ग ६५ वरील झगडे फाटा-वडगाव पान फाटा […]

वावी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू

सिन्नर,दि.१७-तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यासमोर भरतपूर ग्रामपंचायत सदस्य पंकज पेटारे यांनी बचत गटातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी आणि वावी पोलिसांकडून कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.  

शहर विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे एक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध – मंदार पहाडे

कोपरगाव,दि.१६-कोपरगाव शहराला प्रगतीची नवी दिशा दाखवणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात विकास कामांबरोबरच व्यापारी संकुल उभारण्यावर भर देवून व्यापार विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यापूर्वी कोपरगाव बस स्थानाकाच्या लगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्याकडे जात असतांना नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेच्या लगत साडे तीन कोटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आ.आशुतोष […]

जिजामाता उद्यान विकास कामांच्या ५० लाखाच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध- कृष्णा आढाव

कोपरगाव,दि.१३- कोपरगाव शहराचे वैभव असलेल्या शहरातील जिजामाता उद्यानाचा विकास व्हावा अशी कोपरगाव शहरातील नागरिकांसह तमाम महिला भगिनींची मागणी होती.त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी आणलेल्या ५० लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती व या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.त्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे […]

गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस उत्साहात सुरुवात

कोपरगाव,दि.१४- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गौतमनगर कोळपेवाडी येथे गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल स्टेडियमवर सोमवारी सुब्रतो मुखर्जी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. नॉकआउट पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध […]

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ व्या गळीत हंगामाची तयारी मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न

कोपरगाव,दि.१३-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी अंतिम टप्यात आली असून त्यादृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक प्रशांत घुले यांच्याहस्ते  मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा […]

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कोपरगाव,दि.१२- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४, १५ व १६ जुलै रोजी शाळेच्या भव्य फुटबॉल मैदानावर जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर […]

बिरोबा विरभद्र मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ 

सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील बिरोबा विरभद्र मंदिराचा जिर्णोद्धार सोहळ्याची सुरुवात आज सकाळी गावांतून मूर्तीची मिरवणूक काढून करण्यात आली.उद्या दि.१२ रोजी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत विधिवत पूजा करण्यात येणार आहे.     कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा दि.१३ रोजी कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे व माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या शुभहस्ते […]

सडे  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या सौ. अनीता बारहाते यांची बिनविरोध निवड

कोपरगाव,दि.१०- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ.मीराबाई सुदाम बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर काळे गटाच्या सौ.अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध करण्यात आली . सडे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच सौ. आशाताई बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सौ.अनीता संतोष बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी […]

जुलैतच जायकवाडी धरण ६५ टक्के अहिल्यानगर-नाशिकला दिलासा

मुंबई,दि.९- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे दरवर्षी असलेली टांगती तलवार यावर्षी वरुणराजाच्या कृपेमुळे दूरू झाली आहे.२०२० नंतर पुन्हा एकदा जायकवाडी धरण जुलै महिन्यातच ६५ टक्के भरले आहे.त्यामुळे अहिल्यानगर व नासिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आता पाटबंधारे विभागाची जबाबदारी वाढली असून पावसाळ्यात ओव्हर फ्लोच्या पाण्यातून गोदावरी कालवे जास्तीत जास्त […]