जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी कळंब,दि.८-निपाणी येथील महिला शेतकरी सौ.परविन फकरुद्यीन शेख यांच्या कृषी क्षेत्रातील कामगरीची दखल घेत कळंब तालूका पत्रकार संघा तर्फे दिला जाणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार जाहिर केला होता.या पुरस्काराचा वितरण सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे व विश्वस्त सतीश टोनगे यांच्या मार्गर्शणाखाली शिराढोण येथील गायत्री काॅम्प्यूटर्स येथे संपन्न झाला. […]
कोपरगाव,दि.७-कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सोडविण्यात यशस्वी होवून कित्येक दशकापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रस्त्यांचे प्रश्न देखील सुटले आहेत. कोविडच्या काळापासून ऑनलाईन संस्कृती तर वाढली आहेच. परंतु त्याच बरोबर मागील काही वर्षापासून मॉल संस्कृती देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली असतांना देखील कोपरगाव शहरात झालेल्या विकासामुळे कोपरगावच्या बाजार पेठेची आर्थिक उलाढाल वाढविण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन […]
कोपरगाव,दि.६-आषाढी एकादशी निमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये टाळ-मृदंगाच्या साथीने विद्यार्थ्यांचा दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकऱ्यांची वेशभूषा, मुखी हरिनामाचा जागर करीत शाळेतील विद्यार्थी वारीच्या आनंद सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते पंढरीच्या विठुरायाची व रुक्मिणी मातेच्या पालखीचे पूजन करण्यात आले. […]
नाशिक,दि.४- चालूवर्षी मे महिन्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्यामुळे व हवामान विभागाने देखील भरपूर पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज दिल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. परंतु जून महिन्यात अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा […]
कोपरगाव,दि.४- कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर घेवून येणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून सोमवार दि.७ रोजी कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपरिषद इमारती समोर आणखी एक व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे. कोपरगाव शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ५ नं.साठवण तलावाची निर्मिती […]
कोपरगाव,दि.३- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गावांबरोबरच कोपरगाव शहरासाठी देखील आ.आशुतोष काळे यांनी नागरीकांना अपेक्षित असलेल्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. परंतु या निधीतील अनेक कामे प्रलंबित आहेत तर काही कामांना तर अद्याप सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना […]
सिन्नर,दि.२-तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हददीतील मोटारसायकल चो-यांच्या घडत असलेल्या घटनासंदर्भाने बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक, आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग यांनी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सुचना केल्या होत्या.त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी पोलीसांचे विशेष तपास पथक स्थापन केले होते. वावी पोस्टे गुरन ३६ / २०२५ BNS […]
सिन्नर,दि.२-तालुक्यातील दोडी येथील उगले वस्तीवर काळ्या रंगाच्या विनानंबरच्या युनिकॉनमोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला असून भरदुपारी ३ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घटना घडल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील कपाटाचे लॉक तोडून लॉकरमध्ये ठेवलेले ५ […]
कोपरगाव,दि.१- कला,वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर झाल्या असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एम. ए., एम. कॉम.,एम. एस्सी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून स्व.सुशीलामाई काळे […]
कोपरगाव,दि.३० परमपूज्य श्री श्री रवीशंकरजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून हजारो वर्ष जुन्या असलेल्या श्री सोरटी सोमनाथच्या मुळ ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे माझे परमभाग्य असून श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग आत्मबल आणि श्रद्धेचे प्रतिक असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये परमपूज्य श्री श्री रवीशंकरजी महाराज […]
कोपरगाव,दि.२९- संपूर्ण देशात धार्मिक सण-उत्सवाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी रविवारी कोपरगावमध्ये काढण्यात आली होती. या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून सेवा करून श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशिर्वाद घेतले. मागील कित्येक शतकापासून ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे भगवान श्री जगन्नाथाची भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात येते. हा […]
कोपरगाव,दि.२८- पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल व्यवहाराकडे अजून एक पाऊल पुढे टाकतांना आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली हे प्रगतीचे द्योतक असून व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवहार करावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने सुरु […]
सिन्नर,दि.२७-तालुक्यातील वावी येथील कब्रस्तानामध्ये माजी पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून सोलर पॅनलचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार हायमास्ट बसवण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा उदय सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला.कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गणेश वेलजाळी,अनंत मालपाणी,फरीद अत्तार,ईलाहीबक्ष शेख,युसूफ पठाण,सलमान शेख,भावड्या दळवी,नितीन घेगडमल आदी उपस्थित होते.
जगदीशचंद्र जोशी,विशेषप्रतिनिधी धाराशिव,दि.२७- कळंब तालुक्यातील शिराढोण येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शेतकरी गटातील २५ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. तालूका कृषि अधिकारी भागवतराव सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शिराढोण येथील एका शेतकरी गटास अनुदानावरील बियाणे देण्यासाठी सहाय्यक कृषि अधिकारी पद्मसिंह गायकवाड यांनी […]
जगदीशचंद्र जोशी,धाराशिव विशेषप्रतिनिधी धाराशिव,दि.२७- नॅचरल उद्योग समूहाच्या कार्यक्षेत्रात मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे विहीर बोअरवेलला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे आडसाली ऊस लागवड हंगाम २०२४-२५ मधील उसाची समाधानकारक वाढ झाली आहे. तसेच शेतकरी आडसाली ऊस लागवडीचे नियोजन करत आहेत. नॅचरल शुगर कारखाना कार्यक्षेत्रातील लागवड झालेल्या आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस पिकाची पाहणी तसेच ऊस लागवड हंगाम २०२५-२६ […]