नाशिक,दि.२६-नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकांने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारे इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे. पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. […]
नाशिक,दि.२५-महेंद्र गुलाब काळे रा.हाटकर वस्ती कासारी,नांदगाव यांच्या व शेजारच्या घराचे कडी कोंडा तोडून पत्र्याचे पेट्यामध्ये ठेवलेले दीड लाख रोख रक्कम ,चार तोळे वजनाचे दागिने व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.२४- पुढील वर्षीच्या कुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना रस्त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्याची आ.आशुतोष काळेंची मागणी मान्य करण्यात आली असून त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश […]
कोपरगाव,दि.२३- महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा शेकडा निकाल […]
सिन्नर,दि.२२-वावी ते संगमनेर बस सेवा सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी बससेवा परिवहन मंडळाकडून बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सिन्नर आगाराची लासलगाव ते संगमनेर ही बससेवा वावी मार्गे सुरू करावी तसेच वावी संगमनेर बससेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन वावी येथील वाहतूक नियंत्रक यांना विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]
कोपरगाव,दि.२१-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिसर चैतन्याने भरून गेला होता. शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आपली जीवनशैली योगमय करून नियमित योग साधना केली पाहिजे. आपले शरीर आणि मन सुंदर घडवायचे असेल, तर प्रत्येकाने दिवसाची सुरवात […]
कोपरगाव, दि.२०- मा.खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या कृपा आशीर्वादाने मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रेरणेतून मागील वर्षापासून श्री क्षेत्र माहेगाव देशमुख ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी मा.आ.अशोकराव काळे यांनी विधिवत श्री गुरुदत्त महाराजांचे परमभक्त असलेल्या गवळीरामबाबांच्या पालखीचे पूजन करून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना […]
नाशिक,दि.१९-जिल्यातील अनेक तालुक्यात वरूणराजाचे जोरदार आगमन झाले असून शेतकरी राजा सुखावला असून शेतीची कामे आता जोर धरू लागली आहेत.गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पुरही आला आहे.
कोपरगाव,दि.१८- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पुढील उपचारार्थ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा देण्यात हलगर्जीपणा करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेच्या बाबतीत जर असे प्रकार होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेची शहानिशा करून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची […]
कोपरगाव,दि.१७-कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष ईलेक्ट्रिकल विभागाच्या ३३ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांनी दिली. यामध्ये कमिंस इंडिया मध्ये ०५, आय.एफ.बी. मध्ये ०२, इंडोस्कल्प ऑटोकॉम्प्स मध्ये ०८ व आकाश प्रेकिसिओन कॉम्पोनेटस मध्ये १८ […]
नाशिक,दि.१६-नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याअनुषंगानेस्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटरसायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे. […]
सिन्नर,दि.१५-राजेंद्र शंकर पगार यांचे पंचाळे जुना शिवार रस्त्यावर घर असून सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून साडे तीन तोळे सोने व ४५ हजार रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.१५-सिटू कामगार संघटनेच्या घटनेनुसार डॉ.डी.एल. कराड हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.उर्वरित कार्यकारीणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि कंपनी व्यवस्थापक नानासाहेब कोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच रिंग प्लस ॲक्वा कारखान्यात घेण्यात आली. सरचिटणीसपदासाठी कैलास घोटेकर (८६) आणि हरिभाऊ तांबे (३०) यांच्यात झालेल्या लढतीत कैलास घोटेकर हे ५६ मतांनी विजयी […]
कोपरगाव,दि.१४- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील वडगाव-बक्तरपूर येथे आडसाली ऊस पिक व कीड नियंत्रणा बाबत परिसंवाद व चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण होते. कर्मवीर शंकरराव […]
कोपरगाव,दि.१३- आ.आशुतोष काळे यांनी रस्ते व पुलांच्या कामांसाठी मतदार संघातील रस्त्यांसाठी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त निधी आणल्यामुळे बहुतांश रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर झालाच परंतु त्याचबरोबर दळणवळणाला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अशातच अजून एका महत्वाच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मतदार संघातील इतर भागाबरोबरच कोपरगाव तालुक्याचा […]