नाशिक,दि.४- कोकणातील उल्हास खोऱ्यातील व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी सिंचन भवन नाशिक येथे मंत्री महोदय तसेच आमदारांच्या व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आ.आशुतोष काळे देखील उपस्थित […]
सिन्नर,दि.३-रमेश रंगनाथ निरगुडे यांच्या घरासमोरुन मोटारसायकल क्र एम एच १५ डी डब्ल्यू ६८०४ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.२-कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा सोमवार दि. ४ रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आ.आशुतोष काळे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. दरवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी शिराढोण,ता.१-सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील एकमेव नॅचरल उद्योग समूहातील श्री साई ग्रामीण सहकारी पतसंस्था आहे अशी माहिती लातूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भगवानराव ठोंबरे यांनी दिली. रांजणी ता.कळंब येथील श्री साई ग्रामीण पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली […]
शिर्डी,दि.३१- उजनी उपसा सिचंन योजननेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून संबंधित व्यक्तीवर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांच्याकडून शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. उजनी उपसा सिचंन योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून १५० एचपी पंपाद्वारे पाणी लिप्ट करुन धोंडेवाडी […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.३०-तालुक्यातील वावी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सिन्नर अंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरात वैयक्तिक बचत खाते,बचतगटांचे खाते,४३६ रुपयांची प्रधानमंत्री जीवनज्योती योजना वयवर्षं १८ ते ५० वयोगटासाठी,२० रुपयांची प्रधानमंत्री सुरक्षा अपघाती विमा १८ ते ७० वयोगटासाठी,अटल पेन्शन योजना,महिलांसाठी […]
कोपरगाव,दि.२९- गुणवत्ता टिकविण्यासाठी शिस्त ही सवय बनवणे गरजेचे आहे. क्षेत्र कोणतेही असो, शिस्तीच्या आधारावर केलेले कार्य हीच खरी गुणवत्ता असून, स्वयंशिस्तीच्या मार्गावरूनच गुणवत्तेच्या शिखराकडे जाणे शक्य आहे. आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने जाण्याचा मार्ग कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला पुढे जायचे असून गुणवत्ता टिकवायची असेल तर शिस्त हि सवय झाली पाहिजे असा महत्वपूर्ण सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या […]
कोपरगाव शहरात दीड कोटीच्या विकास कामांना प्रारंभ कोपरगाव,दि.२८-सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे. त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. विकासकामांसाठी वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व हि विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरीकांची देखील जबाबदारी असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्र.०१ मध्ये साई सिटी […]
कोपरगाव,दि.२७- २०१९ पासून दरवर्षी अविरतपणे सुरु असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन याहीवर्षी सुरु करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या असून वीज बिलाची रक्कम अदा करून किरकोळ दुरुस्तीची कामे देखील लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. अशीमाहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली. कोपरगाव तालुक्याच्या संगमनेर, राहाता तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या जिरायती भागातील जवळके-धोंडेवाडी […]
कोपरगाव,दि.२६- मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले मात्र त्यानंतर पाऊस रुसून बसल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला नांदूर मध्यमेश्वरच्या नांदूर डाव्या कालव्यातून व पालखेड डाव्या कालव्यांतून गावतळे, बंधारे भरुन देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पूर्व भागातील सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, अंचलगाव, तीळवणी, गावातील काही गावतळे, बंधारे व […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी कळंब,दि.२५- महाराष्ट्र शासनाने इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांच्या डिस्टीलरीजना मळी व उसाच्या रसाबरोबरच धान्यापासून इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्याबाबतचा शासन आदेश आज जारी केला. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विस्माचे वतीने आभार मानले आहे. केंद्र सरकारने २०१८ पासून धान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देऊन महाराष्ट्र राज्याशिवाय इतर सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर […]
कोपरगाव,दि.२५- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाची प्रेरणा घेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती शासनाने हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ज्या-ज्या योजनेसाठी तालुक्यातील नागरीक पात्र असतील त्यांना त्या त्या योजनांचा लाभ मिळवून देवून एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष […]
नाशिक,दि.२४-लोढा भुवन कॉलनीतील एम बी केमिकलच्या समोरील रस्तावर पायी जात असताना कुसुम शिरोडे यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चैन स्कुटीवर आलेल्या इसमाने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत छावणी पोलीस ठाण्यात चंद्रकांत शिरोडे यांनी फिर्याद दिली आहे.
कोपरगाव,दि.२३-विधानसभा मतदार संघातील हजारो नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यासाठी गावोगावी महाराजस्व अभियान राबवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यासाठी वेळप्रसंगी स्वत:ची यंत्रणा देखील उभी केली आहे.परंतु अजूनही काही पात्र लाभधारक नागरीक शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी उद्या शुक्रवार दि.२५ रोजी कोळपेवाडी येथे सुरेगाव गटातील नागरीकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज […]
सिन्नर,दि.२३-तालुक्यातील शहा येथील दत्तात्रय सुदाम कांदळकर यांच्या कुटुंबाला जमिनीच्या वादातून अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींवर वावी पोलिसांनी धातूर मातूर कारवाई केल्याच्या विरोधात तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी यामागणीसाठी संपूर्ण कुटुंबाने वावी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. वावी पोलिसांच्या कार्यप्रणालीविरोधात ५ दिवसात वेगवेगळ्या आंदोलनकर्त्यांचे दुसरे आमरण उपोषण करण्यात येत आहे.