जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१७-कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत सहाय्यक आयुक्त (मत्स्य व्यवसाय)जलील अहमद पटेल यांचा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या अंतर्गत शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय धाराशिव कार्यालय हे सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली राज्यातील जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.याबद्दल सहाय्यक आयुक्त जलील […]
जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी धाराशिव,दि.१७-बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणातील पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने (शनिवारी ता.१६) दुपारी सव्वा दोन वाजता मांजरा प्रकल्पाचे चार वक्रद्वारे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्यूसेक्स (९८.९६क्यूमेक्स ) इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. […]
कोपरगाव,दि.१६- मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आपले नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना उद्योग व्यवसायाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारणार आहेत. भविष्यात कोपरगावमध्ये होणाऱ्या या एम.आय.डी.सी.मध्ये कोपरगाव मतदारसंघातील उद्योजकांचा मोठा सहभाग असावा यासाठी कोपरगाव मतदारसंघातील व्यापारी बांधवांनी व उद्योजकांनी आपले जागा मागणीचे जास्तीत जास्त […]
सिन्नर,दि.१५-तालुक्यातील वावी येथील आर.पी.गोडगे पाटील पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई गोडगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर.मुरकुटे यांनी केले.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांच्या सुरांवर सामुहिक कवायत मैदानावर सादर केली.तसेच एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी लिडर समीर […]
कोपरगाव,दि.१४- शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते, मात्र पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१३-तालुक्यातील वावी येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पंडित जाधव व उपाध्यक्ष सिताराम किसन सापते यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून टाय व बेल्टचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाणके,गजानन ठोंबरे,रमेश राजपूत,योगेश शेवरे,ज्योती गोर्वधने,मनीषा हांडे,गौरी जाधव,मनीषा रासकर,सुनंदा नवले,नाना नवले,बाळासाहेब […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१३-सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील कहांडळवाडी,समृद्धी शिवारात सोमवारी मध्यरात्री ड्रोन कॅमरे फिरत असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेले असतानाच मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ड्रोन कॅमेरे पूर्व भागात दिसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून यावेळी पाथरे शिवार ,पिंपरवाडी शिवार,वावी शिवार व पांगरी शिवारातही कॅमेरे दिसल्याने हा नक्की काय प्रकार आहे याबाबत परिसरात चर्चा सुरू […]
कोपरगाव,दि.१२- आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कोपरगाव शहरात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. हा उत्सव गेली अनेक वर्षे तालुक्यातील एक लोकप्रिय आणि भव्य सांस्कृतिक पर्व म्हणून ओळखला जात आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, भव्य सजावट, तसेच आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे राष्ट्रवादीच्या दहीहंडीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते व तालुक्याभरातून नागरिक या दहीहंडी उत्सवात सहभागी होतात. दरवर्षी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी नामवंत कलाकारांची उपस्थिती, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक […]
कोपरगाव,दि.११– कोपरगाव तालुका व पंचक्रोशीतील शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी कारखान्याचे संचालक प्रवीण जगन्नाथ शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी शिराढोण,दि.१० जन्मभूमीत स्वच्छता रहावी गावकरी बांधवांचे आरोग्य उत्तम रहावं यासाठी कळंब तालुक्यातील शिराढोणचे भूमी पूत्र सलीमभाई गनी शेख यांनी वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून गावातील ओला व सुखा कचरा जमा करण्यासाठी ७ लाख २५ हजार रुपये खर्चून घंटागाडी गावासाठी देण्यात आली व त्याचे लोकार्पण सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीराव […]
रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाचा अद्वितीय संगम कोपरगाव,दि.९– आपला भारत देश ही सणांची भूमी आहे येथे प्रत्येक ऋतूत सण साजरे केले जातात कारण त्यामागे थोर परंपरा आहे. आपल्या सणांमध्ये केवळ उत्सवाचा आनंद नसतो, तर त्यामागे दडलेली मूल्यं, आपुलकी, सामाजिक एकोपा आणि नात्यांतील गुंतवणूकही असते. आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेली असून याचा अर्थ ‘सारा समाज एक कुटुंब’ असा होतो.रक्षाबंधन हा सण देखील असाच भावनिक नात्यांचा सण आहे. या […]
मुंबई,दि.८- कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा व सातत्याने प्रमाणापेक्षा जास्त अवजड वाहतुकीचा भार सोसणाऱ्या झगडे फाटा ते तळेगाव फाटा (रा.मा. ६५) या जवळपास १७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते निधीतून निधी द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. व यासाठी स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार […]
कोपरगाव,दि.७- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा फैलाव होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच लम्पीबाधित क्षेत्र म्हणून घोषित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पशुधन सुरक्षित राहील यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन अधिकारी श्रीम.श्रद्धा काटे यांना दिल्या. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा फैलाव वाढत […]
कोपरगाव,दि.५- आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांना देखील भावला आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात जोरात इनकमिंग सुरु आहे. हि इनकमिंग नियमितपणे सुरूच असून आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवशी कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेच्या (उबाठा गट) तालुकाध्यक्षाणे आपल्या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मागील पाच वर्षात आ.आशुतोष […]
कोपरगाव,दि.५ कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस भव्य आमदार क्रीडा महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या मोबाईल, इंटरनेटचा वापर वाढला असून सध्याच्या पिढीचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. […]