जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
शिराढोण,दि.१० जन्मभूमीत स्वच्छता रहावी गावकरी बांधवांचे आरोग्य उत्तम रहावं यासाठी कळंब तालुक्यातील शिराढोणचे भूमी पूत्र सलीमभाई गनी शेख यांनी वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून गावातील ओला व सुखा कचरा जमा करण्यासाठी ७ लाख २५ हजार रुपये खर्चून घंटागाडी गावासाठी देण्यात आली व त्याचे लोकार्पण सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एक हजार कचरा कुंड्याचेही लोकार्पण करण्यात आले.कचरा कुंड्या गावातील व्यापारी तसेच ग्रामस्थाना देण्यात आल्या.विशेष म्हणजे घंटा गाडीच्या इंधनासह व चालकाचा पगार खर्च सलीमभाई शेख करणार आहेत.ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम रहावे गावात स्वच्छता रहावी यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलीमभाई शेख यांनी हि घंटा गाडी सव्वा सात लाख रुपये खर्चून ग्रामस्थांसाठी दिली असल्याची माहिती उपसरपंच अमोल माकोडे यांनी दिली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब पाटील,माजी सरपंच पद्माकर पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य राजेश्वर पाटील,उपसरपंच अमोल माकोडे,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद कापसे,नितीन पाटील,माजी चेअरमन नासेर पठाण,बाळासाहेब सोनके ग्राम पंचायत सदस्य ॲड नितीन यादव,अय्युब खुरेशी,राजू डांगे,सुमंत नाईकवाडे,आकाश धाकतोडें,अमोल नाईकवाडे,सलमान बडे,मतीन बागवान, बब्बु खुरेशी,शिवाजी गाडे,राजेंद्र वाघमारे,उत्तम खडबडे,मकबूल डांगे,कलीम बागवान,मनोज पाटील,अलीकबर पठाण,अमीर डांगे,सुरेश माकोडे,दादा खतीब,नूर डांगे,ॲड अमोल माकोडे,संजय नान्नजकर उपस्थितीत होते.