कारखान्याचे विद्यमान व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या व्हा.चेअरमनपदी प्रवीण शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्यांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले असून माझ्या शिंदे कुटुंबावर देखील त्यांनी भरभरून प्रेम केले आहे.
त्यामुळे आमचे कुटुंबातील सदस्यांना यापूर्वी दोन वेळेस व्हा.चेअरमन पदाची जबाबदारी मिळाली व माझ्या कुटुंबातून मी तिसऱ्यांदा व्हा.चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळणार आहे हे केवळ काळे कुटुंबियाच्या प्रेमामुळे शक्य झाले असून काळे परिवाराची ही परंपरा कारखान्याचे चेअरमन व कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे हे पुढे चालवत आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असतांना कारखाना देखील प्रगतीपथावर आहे. अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांनी माजी आमदार अशोकराव काळे,आ.आशुतोष काळे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.
मावळते व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण म्हणाले की,कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या सोबत व्हा.चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळत असतांना आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीतून त्यांच्या सहका
यावेळी कारखान्याचे मावळते व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिन्द्र बर्डे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम, सुनिल मांजरे, मनोज जगझाप, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, प्रशांत घुले, सौ.वत्सलाबाई जाधव, सौ. इंदुबाई शिंदे, श्रावण आसणे, गंगाधर औताडे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर संजय गोंदे यांनी काम पाहिले.