सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्यकलाविष्काराने दांडिया स्पर्धकांचा उत्साह वाढविला

कोपरगाव,दि.९ :- नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि याच नवरात्र उत्सवानिमित्त आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेला अनेक कलाकारांसह महिला भगिनींनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. या दांडिया स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती, नृत्य आणि सामुदायिक भावनेचा उत्सव कोपरगावकरांनी अनुभवला. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या दांडिया स्पर्धेला दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिच्या उपस्थितीने व तिच्या […]

घराचे कुलूप तोडून १५ तोळे सोने लंपास

  नाशिक,दि.८-अभिमन माधवराव बिरारी रा.सुयोग मंगल कार्यालयाजवळ,मालेगाव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १५ तोळे सोने चोरीस गेल्याची घटना घडली आहे.याबाबत मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक कोळपकर करीत आहे.

गुलाबी साडी फेम संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याच्या ठेक्यावर हजारो महिलांनी धरला ताल

कोपरगाव,दि.७- कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सव कार्यक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी– या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी […]

दांडिया स्पर्धेला सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक लावणार हजेरी

कोपरगाव,दि.६-आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य दांडिया स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. […]

पंचाळेत गंगागिरी महाराज सप्ताह ध्वजावतरण कार्यक्रम संपन्न

गणेश ओझा,प्रतिनिधी   वावी,दि.६-सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे श्रीरामपूर तालुक्यातील महंत गंगागिरी महाराजांच्या सरला बेटाच्या वतीने दि.१० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहासाठी २४ जुलै रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला होता.या सप्ताह कालावधीमध्ये अखंड भजन,अन्नदान,कृषी प्रदर्शन,प्रवचन व कीर्तन संपन्न झाले होते. संपुर्ण सप्ताह कार्यक्रमास पंन्नास लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली […]

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

कोपरगाव,दि.६-सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.०८ रोजी सकाळी १०.३० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. शंकरराव चव्हाण  व त्यांच्या सुविद्य […]

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाविरोधात दिपक वेलजाळी  यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

वावी,दि.५-सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र १६० वर काम करणाऱ्या मजुरांच्या झालेल्या अपघाताची चौकशी करावी,अतिक्रमणे कायमस्वरूपी काढावीत, जळालेल्या झाडांसंदर्भात ठेकेदारावर कारवाई करावी या मागण्यांसाठी दिपक वेलजाळी यांनी पिंपरवाडी टोला प्लाझा येथे बारा दिवस धरणे आंदोलन करूनही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने शुक्रवारी दुपारपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.        त्यांनी अन्नत्याग […]

गुलाबी साडी फेम सिंगर संजू राठोड उद्या कोपरगावात

कोपरगाव,दि.५ :- चित्रपटसृष्टीत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारा ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल—दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ काही महिन्यापूर्वी आलेल्या ह्या गाण्याचे प्रसिद्ध गायक संजू राठोड उद्या रविवार दि.६ रोजी आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर मैदान या […]

घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक,दि.५-महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हापोलीस अधीक्षक  विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक,विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.     आज पहाटेचे सुमारास […]

बाळासाहेब मराळे यांना राज्य शासनाचा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रधान

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.५-येथून जवळच असलेल्या शहा येथील बाळासाहेब मराळे हे १९९९ सालापासून शेवगा पिकाची शेती करतात .शेती बरोबरच त्यांनी विविध प्रयोग व संशोधन करून शेवगा पिकाचा राज्यातील शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार केला. शेवगा लागवड ,छाटणी ,खत व्यवस्थापन याविषयी मराळे यांनी शेवगा पॅटर्न विकसित केला आहे . तसेच  शेवग्याचा  रोहित -१ हा वान  विकसित केला. शेवगा […]

आदिशक्ती सप्तश्रुंगीच्या पादुकांची कोपरगाव शहरात जंगी मिरवणूक

  कोपरगाव,दि.४ :- मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी वणी गडावरून  आणलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे कोपरगाव शहरात गुरुवारी संत महतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या गजरात, लेझीम व झांझ पथकाच्या तालात, भव्य दिव्य स्वरुपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या या भक्ती सोहळ्याला भाविकांची  मोठी गर्दी उसळल्याचे यावेळी दिसून आले. शहरातील चौकाचौकात […]