पोलीस प्रशासन नागरिकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही आ.आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सूचना

कोपरगाव,दि.२८- आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरीक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेवून येत असतात. या तक्रारी व अडचणी सोडवून नागरीकांना आधार देण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे आहे. जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे […]

कोपरगाव तहसील कार्यालयात उद्या आ.आशुतोष काळेंचा जनता दरबार

कोपरगाव,दि.२७- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आज शुक्रवार दि.२८ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणींचा […]

वावी आणि सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

सिन्नर,दि.२६-१ फेब्रुवारी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप याठिकाणी उभे असलेली मालट्रक क्र. पी.बी.५ ए.पी. ८३१३ हिचे डिझेल टँक मधुन १४,६६९/- रूपये किंमतीचे १६० लिटर डिझेल लबाडीचे इराद्याने चोरी करून चोरून नेले होते. सदर बाबत वावी पोलीस ठाणेस गुरनं ४४ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल […]

दुसंगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२१-तालुक्यातील दुसंगवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.     शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊपाटील ढमाले हे अध्यक्षतेस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव प्राचार्य एस.बी.देशमुख,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य भागिनाथ घोटेकर,सरपंच कानिफनाथ घोटेकर,जिजाऊ प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा लताताई ढमाले,उपसरपंच रवींद्र कहांडळ,माजी सरपंच […]

इतिहासाची साक्ष देणारा  शिवजन्मोत्सव सोहळा पाथरेत साजरा

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२०-तालुक्यातील पाथरे येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी एक अविस्मरणीय आणि इतिहासाची साक्ष देणारे असा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.     सोहळ्याची सुरुवात गावातील तरुणांनी एकत्र येऊन गाव पूर्ण स्वच्छ करून शिवजयंतीला सुरुवात केली.गावात  घरोघरी रांगोळी काढून भगवे ध्वज फडकविण्यात आले होते.सकाळी गावाची वेसस्वच्छ धुवून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा त्याचबरोबर राजमाता जिजाऊ,छत्रपती संभाजी […]

आ.आशुतोष काळेंचा ‘जनता दरबार’ बनले नागरिकांचे  प्रश्न मार्गी लागण्याचे हक्काचे व्यासपीठ

कोपरगाव,दि.१० – विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागतांना त्यांना त्रास होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेवून तात्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेवून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे […]

अशी असेल वावी येथील बारावी परीक्षेची आसन व्यवस्था

सिन्नर,दि.१०-येथील नूतन विद्यालय व ॲड.रावसाहेब शिंदे कला,विज्ञान महाविद्यालयात बारावी परीक्षा केंद्र क्रमांक १७४ मध्ये एसओ १५१५० ते एसओ ९७६११  अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.    बारावीची लेखी परीक्षा मंगळवार दि.११ फेब्रुवारीपासून सुरू होत असून नूतन विद्यालय वावीचे १४५ विद्यार्थी, ज्युनिअर कॉलेज पांगरी येथील १३२ विद्यार्थी व जुनिअर कॉलेज पाथरे येथील ३१ विद्यार्थी असे एकूण […]

समृद्धी महामार्गावरील लोखंडी गेट व पाईपची चोरी

सिन्नर,दि.९-समृद्धी महामार्गाचे चॅनल नंबर ५५७ ते ५५८ या अंतरावरील खंबाळे शिवारातील लोखंडी गेट व मोटारीचे पाईप,स्टार्टर व केबलची चोरी झाल्याची फिर्याद वावी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बबन टरले यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तु व खाऊंचे वाटप

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.९-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमत्त सिन्नर तालुका शिवसेनेच्यावतीने वावी येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वही,पेन,बिस्कीट,केळी वाटप करण्यात आले.अनाथ मुलांना भेटवस्तू देवुन वाढदिवस साजरा करण्यात आला.     यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सिन्नर योगेश म्हस्के,युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम कुटे,गटप्रमुख कैलास घोटेकर,अनिकेत काटे,अभी पगार,विशाल कुटे,भैया तळेकर,धनंजय थोरात, गणेश सैंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वावी-समृद्धीमहामार्गावर मलढोणशिवारात इनहोव्हा कार व कंटेनरचा भीषण अपघात ३ ठार 

    सिन्नर,दि.१-मुंबई नागपूर समृद्धीमहामार्गावर नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इनहोव्हा कारने मलढोण शिवारात समोर चालणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली त्यात प्रतापराव सावंत देसाई,भाग्यवान झगडे व अथर्व किरण निकम सर्व रा. रत्नागिरी यांचा मृत्यू झाला तर किरण वसंत निकम,रमाकांत अंकुश पांचाळ गंभीर जखमी झाले आहे.       याबाबत वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला […]