सिन्नर,दि.१६- तालुक्यातील पाथरे येथे जिल्हा परिषद सदस्या इंजि.सिमंतिनी कोकाटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिनेवस्ती,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरोडेवस्ती व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब फ्रेंड सर्कल पाथरे यांच्याकडून फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच स्वाती नरोडे,साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र चिने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत चिने,सचिव पवन नरोडे,पोलिस पाटील प्रदिप नरोडे,भाऊसाहेब नाना नरोडे,चंद्रकांत चिने, राजेंद्र बिडवे,विक्रम चिने,अरुण नरोडे,अनिल गिते ज्ञानेश्वर थोरात,भरत सुडके गणेश चिने,गोरक्षनाथ चिने,दिगंबर शेळके,अण्णासाहेब नरोडे,नवनाथ संतोष चिने,सुडके,नरोडे,पगार,ढवण आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक निमसे यांनी आभार मानले.