शिर्डी,दि.३१- उजनी उपसा सिचंन योजननेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून संबंधित व्यक्तीवर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांच्याकडून शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. उजनी उपसा सिचंन योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून १५० एचपी पंपाद्वारे पाणी लिप्ट करुन धोंडेवाडी […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.३०-तालुक्यातील वावी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सिन्नर अंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरात वैयक्तिक बचत खाते,बचतगटांचे खाते,४३६ रुपयांची प्रधानमंत्री जीवनज्योती योजना वयवर्षं १८ ते ५० वयोगटासाठी,२० रुपयांची प्रधानमंत्री सुरक्षा अपघाती विमा १८ ते ७० वयोगटासाठी,अटल पेन्शन योजना,महिलांसाठी […]
कोपरगाव,दि.२९- गुणवत्ता टिकविण्यासाठी शिस्त ही सवय बनवणे गरजेचे आहे. क्षेत्र कोणतेही असो, शिस्तीच्या आधारावर केलेले कार्य हीच खरी गुणवत्ता असून, स्वयंशिस्तीच्या मार्गावरूनच गुणवत्तेच्या शिखराकडे जाणे शक्य आहे. आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने जाण्याचा मार्ग कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला पुढे जायचे असून गुणवत्ता टिकवायची असेल तर शिस्त हि सवय झाली पाहिजे असा महत्वपूर्ण सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या […]
कोपरगाव शहरात दीड कोटीच्या विकास कामांना प्रारंभ कोपरगाव,दि.२८-सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे. त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. विकासकामांसाठी वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व हि विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरीकांची देखील जबाबदारी असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्र.०१ मध्ये साई सिटी […]
कोपरगाव,दि.२७- २०१९ पासून दरवर्षी अविरतपणे सुरु असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन याहीवर्षी सुरु करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या असून वीज बिलाची रक्कम अदा करून किरकोळ दुरुस्तीची कामे देखील लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. अशीमाहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली. कोपरगाव तालुक्याच्या संगमनेर, राहाता तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या जिरायती भागातील जवळके-धोंडेवाडी […]
कोपरगाव,दि.२६- मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले मात्र त्यानंतर पाऊस रुसून बसल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला नांदूर मध्यमेश्वरच्या नांदूर डाव्या कालव्यातून व पालखेड डाव्या कालव्यांतून गावतळे, बंधारे भरुन देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पूर्व भागातील सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, अंचलगाव, तीळवणी, गावातील काही गावतळे, बंधारे व […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी कळंब,दि.२५- महाराष्ट्र शासनाने इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांच्या डिस्टीलरीजना मळी व उसाच्या रसाबरोबरच धान्यापासून इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्याबाबतचा शासन आदेश आज जारी केला. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विस्माचे वतीने आभार मानले आहे. केंद्र सरकारने २०१८ पासून धान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देऊन महाराष्ट्र राज्याशिवाय इतर सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर […]
कोपरगाव,दि.२५- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाची प्रेरणा घेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती शासनाने हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ज्या-ज्या योजनेसाठी तालुक्यातील नागरीक पात्र असतील त्यांना त्या त्या योजनांचा लाभ मिळवून देवून एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष […]
नाशिक,दि.२४-लोढा भुवन कॉलनीतील एम बी केमिकलच्या समोरील रस्तावर पायी जात असताना कुसुम शिरोडे यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चैन स्कुटीवर आलेल्या इसमाने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत छावणी पोलीस ठाण्यात चंद्रकांत शिरोडे यांनी फिर्याद दिली आहे.
कोपरगाव,दि.२३-विधानसभा मतदार संघातील हजारो नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यासाठी गावोगावी महाराजस्व अभियान राबवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यासाठी वेळप्रसंगी स्वत:ची यंत्रणा देखील उभी केली आहे.परंतु अजूनही काही पात्र लाभधारक नागरीक शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी उद्या शुक्रवार दि.२५ रोजी कोळपेवाडी येथे सुरेगाव गटातील नागरीकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज […]
सिन्नर,दि.२३-तालुक्यातील शहा येथील दत्तात्रय सुदाम कांदळकर यांच्या कुटुंबाला जमिनीच्या वादातून अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींवर वावी पोलिसांनी धातूर मातूर कारवाई केल्याच्या विरोधात तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी यामागणीसाठी संपूर्ण कुटुंबाने वावी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. वावी पोलिसांच्या कार्यप्रणालीविरोधात ५ दिवसात वेगवेगळ्या आंदोलनकर्त्यांचे दुसरे आमरण उपोषण करण्यात येत आहे.
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२२-तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींसाठी ‘सक्षम तू’ कार्यक्रमाचे आयोजन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ग्रामीण सरचिटणीस हेमलता सुनील कासार यांनी केले होते. यावेळी उपनिरीक्षक प्रमोद सरोवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे,भारतीय न्याय संहिताचे कलमे,कायदेविषयक माहिती,पोक्सो,पोलिसांचे टोल फ्री संपर्क क्रमांक याबाबत माहिती दिली. […]
कोपरगाव,दि.२१-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मेस विभाग परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविली व सायंकाळी इंटर हाऊसेस फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून अनोख्या पद्धतीने सचिव […]
कोपरगाव,दि.२०- ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष याप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी […]
सिन्नर,दि.१९-सरकारने निवडणुकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही त्यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी,दिव्यांगाचे नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा.आ.बच्चु कडू यांनी दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी उपोषण,आंदोलन, पायी यात्रा काढल्या असून २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिक पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ २४ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ वेळेत प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम […]