नॅचरल उद्योग समूहाला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

     जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.३०-नॅचरल उद्योग समूहाला आर्थिक वर्षात ५५ कोटी ९ लाख रुपये नफा झाला असून कारखाना सभासदांना २५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी बी ठोंबरे यांनी दिली.       सभासदाना कारखाना उभारणी पासून सातत्याने लाभांश देणारा देशांतील पहिला साखर उद्योग आहे.साखर कारखाना युनीट तोटयात जावूनही […]

कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आ.आशुतोष काळेंचे अजून एक पाऊल पुढे

कोपरगाव,दि.२९- कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहराच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव सबस्टेशनवरचा भार कमी करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. आता त्यापुढे जावून कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबाबत नुकतीच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत कोपरगाव शहरात महावितरणचे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. […]

कोपरगाव मंडलात ६५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस

भरपावसात आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर कोपरगाव,दि.२८:- कोपरगाव मतदार संघात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले.काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका,तूर,भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती […]

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत नूतन विद्यालय वावी संघ उपविजेता

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.२७-क्रीडा व युवक संचालनलय,जिल्हा क्रीड़ा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा विभागीय क्रीड़ा संकुल येथे पार पडल्या.      १९ वर्ष वयोगट मुले व मुलींचे एकूण २५ संघानी स्पर्धेत  सहभाग नोंदवला त्यात स्पर्धेत नुतन विद्यालय वावी संघाला उपविजेते पद मिळाले.संघात राणी खाटेकर,तेजल खरात, अनुष्का ढमाले,आराध्या जम्बूकर,श्रद्धा घोटेकर,दिक्षा कांदळकर,कोमल सरोदे,प्रतिक्षा […]

सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

कोपरगाव,दि.२६– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळवून महाविद्यालयाची मान उंचावली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी गाढेची प्रजासत्ताक दिन पूर्व संचालन निवड चाचणी शिबिरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने निवड […]

नॅचरल शुगरला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५- गाळप हंगाम २०२४-२५ मधील साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी कारखान्याला दि डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या वतीने राज्यातील सर्वाेत्कृष्ट साखर कारखाना’ हया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते पुणे येथे करण्यात आले.        यावेळी सहकार […]

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे

कोपरगाव,दि.२४- भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली तर नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक आपल्या नावावर करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यावरून असे दिसून येते की, गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढली असून भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढला आहे.हा दबदबा असाच टिकून ठेवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय […]

वावी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी,उद्योजक राजेंद्र कापसे यांच्याकडून विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२३-येथील नूतन विद्यालय व अँड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.     कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर गावांतून प्रभातफेरी  काढण्यात आली.त्यात लेझीम पथक,टिपऱ्या पथक,झांजपथक त्याचप्रमाणे  विविध पेहराव असणारे विद्यार्थी,समतेचा संदेश देणारे फलक,पर्यावरण जनजागृती फलक घेऊन विद्यार्थी […]

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

कोपरगाव,दि.२२-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.   रोजच्या […]

श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून मोटारसायकल चोरीला

  नाशिक,दि.२१-किरण त्रंबक पानवगव्हाणे यांची युनिकॉर्न मोटारसायकल क्र.एम.एच १५  सी.झेड ७९६९ ची निफाड येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून चोरी झाली असून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाकडे पूणे विभागाचे नेतृत्व

कोपरगाव,दि.२०- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने पीसीएमसी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नेहरू हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करतांना नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले.स्पर्धेचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट पेट्रिक्स स्कूल,  पुणे (पूणे, शहर) यांच्यात झाला. या सामन्यात आपल्या […]

गौतम बँकेला दुहेरी राष्ट्रीय मान

कोपरगाव,दि.१९- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. परंतु यापुढे जावून गौतम बँकेने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराला गवसणी घातली आहे ती देखील एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची अतुलनीय कामगिरी गौतम बँकेने करून दाखविली आहे. देश पातळीवरील […]

कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – सौ. पुष्पाताई काळे

कोपरगाव,दि.१८- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार दि.२२ सप्टेंबर ते बुधवार दि.१ ऑक्टोबरपर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली.   दरवर्षी महिला भगिनींना आतुरता असणारा “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव […]

नवीन पाच बसचे लोकार्पण

कोपरगाव,दि.१७-कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉंक्रीटिकरण उखडले जावून खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची हि अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बसस्थानकाच्या आगारात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.लवकरात निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून निधी उपलब्ध होताच संपूर्ण बस […]

सिन्नर-शेतातून २ लाख रुपयांचे डाळिंब चोरीला

  सिन्नर,दि.१६-तालुक्यातील किर्तांगळी शिवारातील रावसाहेब शंकर चव्हाणके यांच्या शेतातील २० किलो वजनाचे १०० कॅरेट असे २ लाख किंमतीचे डाळिंब चोरी गेल्याची घटना घडली असून एम.आय.डी सी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.