जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.३०-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.दादांच्या आकस्मीत जाण्याने राज्यातील साखर उद्योगासह नॅचरल शुगर परिवाराचीही कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचे नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी दादांना श्रध्दांजली अपर्ण करताना सांगितले. महाराष्ट्रातीचे कुशल,निर्भीड व प्रशासनावर वचक असणारे नेतृत्व राज्याने गमावले आहे.दादा […]
नाशिक,दि.३०-महेश अशोक शेलार रा.धोंडबार यांच्या बंद घराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटामधील १ लाख २० हजार किंमतीची सोन्याची चैन व १ लाख रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.२९-प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना व दिव्यांग सेवा बहुउद्देशीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क मिंडा फाउंडेशन आयोजित मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृह,वावी येथे उद्या शुक्रवार दि.३० जानेवारी ९ ते ३ वाजेपर्यंत केले असल्याची माहिती दत्तात्रय लोंढे यांनी दिली. शिबिरात कृत्रिम पाय,हात,कुबड्या,काठी,वाकर,यूडीआयडी कार्ड रजिस्ट्रेशन, रोजगार व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार […]
सिन्नर,दि.२८-तालुक्यातील कहांडळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आधारकार्ड व रेशनकार्ड बनविताना येणाऱ्या अडचणी व अचूक माहिती ऑनलाइन पध्दतीने अपडेट करून नागरिकांना भविष्यातील योजनांचा फायदा घेता यावा अशा दूरदृष्टीने सेवा शिबिराचे आयोजन शालेय व्यवस्थापण समिती सदस्य रविंद्र कहांडळ यांनी केले असून सकाळी १० ते ४.३० या वेळेत नागरिकांना लाभ घ्यावा.
कोपरगाव,दि.२६- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक पठारे याने हॉकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत कार्तिकने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या दमदार कामगिरीची दखल घेत त्याची निवड टि. […]
गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.२५-नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा वावी ते कहांडळवाडी रस्त्याची चाळण होवून आता मोठे मोठे खड्डे पडूनही त्याकडे लक्ष देण्यासाठी संबंधित खात्याला वेळच नसल्याने सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणाने मालमतेचे व्यवस्थापण करण्यात अयशस्वी झाल्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल करावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल भीमराज भेंडाळे यांनी वावी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ […]
कोपरगाव,दि.२१-अंचलगावाच्या सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून स्वतःचा मुलगा घरकुलासाठी पात्र नसतांना देखील बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घरकुल मंजूर करून घेतले होते. तसेच सदरचे मंजूर घरकुल सरकारी जागेत अतिक्रमण करत बांधले आहे. याबाबत काळे गटाकडून दादासाहेब बनसोडे व कार्यकर्त्यांनी मा.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीची सविस्तर चौकशी केली असता त्यामध्ये अंचलगावच्या […]
सिन्नर,दि.१८-भगवंता वाळीबा साबळे रा.नांदूरशिंगोटे यांच्या शेतातील ५ एचपी सौरऊर्जा इलेक्ट्रीक मोटारची चोरी चोरट्यांनी केली असून याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.१६-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर येथे पायी जात असताना स्वाती संतोष जाजू,रा.चैतन्य अपार्टमेंट,शिवाजीनगर सिन्नर यांच्या गळ्यातील सोन्याची एक तोळे वजनाची पोत अज्ञात दोन मोटारसायकलवरील इसमांनी गळ्यातून हिसकावून ओढून नेल्याची घटना सायंकाळी सातच्या दरम्यान घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.१४-गोंदे शिवारातील कृषीधन ऍग्रोमॉलच्या भिंतीचे पत्रे वाकवून चोरट्यांनी विविध कंपनीचे ८३,२३५ किंमतीचे औषधे चोरून नेल्याची घटना घडली असून प्रदीप बाळासाहेब आव्हाड यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोपरगाव,दि.१३-कोपरगाव मतदार संघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली असून त्या ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाका अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना दिला. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांची […]
सिन्नर,दि.१२-एच.सी.जी मानवता कॅन्सर सेंटर यांच्याकडून स्व.सौ.नंदावती सुभाष भुतडा व स्व.सौ.मनीषा ओंकार मालपाणी यांच्या स्मरणार्थ मोफत कॅन्सर निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक सभागृहात करण्यात आले होते त्यात १३० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून श्री दत्तधाम पंचाळेचे राहुल मालपाणी,कॅन्सरतज्ञ डॉक्टर निष्ठा तनेजा,सरपंच विजय काटे,उपसरपंच प्रेमलता जाजू,कृषी […]
गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील ५ वर्षाची कादंबरी भूषण लढ्ढा हिने स्केटिंग सारख्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयपातळीवर यशाला गवसणी घातली आहे. खोपोली येथील याक पब्लिक स्कूल,एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन फॉर नॅशनल लेव्हल सिलेक्शन येथे पार पडलेल्या स्केटिंग रिंक ट्रॅक क्वाड्स प्रकारात ६ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात तिने कांस्य पदक मिळवीत एन्ड्युरन्स महाराष्ट्र असोसिएशन पुणेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड […]
कोपरगाव,दि.१०- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत गोदावरी कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या डाव्या-उजव्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करा आणि अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख […]
सिन्नर,दि.९-एच.सी.जी मानवता कॅन्सर सेंटर यांच्याकडून स्व.सौ.नंदावती सुभाष भुतडा व स्व.सौ.मनीषा ओंकार मालपाणी यांच्या स्मरणार्थ मोफत कॅन्सर निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक सभागृहात रविवार दि.११ जानेवारी सकाळी १० ते ४ या वेळेत केले असून त्यात महिलांच्या,तोंडाचे, गर्भाशयाच्या अशा विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहे तरी शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन माहेश्वरी […]