जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.१२-कळंब तालुक्यातील राजंणी येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन साई मल्टी स्टेट कोआँपरेटीव्ह सोसायटीला यावर्षी ७ कोटी ३९ लाख ६४ हजार रुपये नफा झाला असून सभासदाना आठरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष कृषी रत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली.
एन साई मल्टी स्टेट को आँपरेटीव्ह सोसायटीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी ता.१२ साई मंगल कार्यालयात घेण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष किशोर डाळे,संचालक नागनाथ कनामे,नँचरल उद्योग समुहाचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे,पांडुरंग आवाड,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव टेकाळे,बालासाहेब टेळे,सौ आशालता रेड्डी,बाबूराव जाधव लेखापरिक्षक विजयकुमार भंडारी,सरव्यवस्थापक उमेश गायकवाड.प्राचार्य जगदीश गवळी उपस्थित होते.
ठोंबरे म्हणाले,बँकेच्या सोळा शाखेत २५० कोटी ५५ लाख ७२ हजार रुपयांच्या ठेवी असून ११२ कोटी ०७ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या १४१४८ सभासदांचे ४ कोटी ५९ लाख ८६ हजार रुपये भाग भांडवल आहे. तर बँकेची वसूली ९७.७५ टक्के आहे.
साई काॅलेज ऑफ काॅम्प्युटर एज्युकेशन रांजणी च्या बीसीएस मध्ये वैष्णवी भारत घटमल (प्रथम शिराढोण),आकांक्षा अंगद साळूंके (द्वितीय घारगाव) साक्षी बन्सी आदमाने (तृतीय रांजणी)आणि बीसीए मधे कांदबरी रामभाऊ ढवारे (प्रथम रांजणी),साक्षी बुबासाहेब देशमुख (द्वितीय कोपरा) प्रतिभा शिवाजी नांगरे (तृतीय जायफळ) या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदतीचा धनादेश देण्यात आला.या वेळी बॅकेचे सभासद तसेच शाखाप्रमुख उपस्थितहोते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरव्यवस्थापक उमेश गायकवाड यांनी केले.तर उपाध्यक्ष किशोर डाळे यांनी आभार मानले.