वावी येथील मोटरसायकली चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
 
 
नाशिक,दि.१६-नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याअनुषंगानेस्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटरसायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे पथकातील अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना,गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावचे शिवारात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पोलीसपथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
१) अजय दत्तात्रय दळवी, वय २१, रा. विंचुरदळवी, भावदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
२) अनिकेत श्रीधर मानकर, वय २४, रा. राहुरी, भगुर – पांढुर्ली रोड, ता. जि. नाशिक
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार यांनी मिळून सदरची मोटरसायकल चिंचोली ता. सिन्नर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
 
 
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क्र. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी, तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपुर परिसरातुन एकुण १० मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटर सायकल चोरीचे खालीलप्रमाणे ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
१) सिन्नर पो.स्टे. गुरनं ३३३ / २०२४ भा.द.वि. कलम ३७९.
२) वावी पो.स्टे. गुरनं २५० / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२).
३) संगमनेर शहर पो.स्टे. जिल्हा अहिल्यानगर, गुरनं ६९७ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२).
४) वणी पो.स्टे. गुरनं १९२/२०२४ भा.द.वि. कलम ३.
५) वावी पो.स्टे. गुरनं ३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९.
६) घोटी पो.स्टे. गुरनं ६३ / २०२४ भा.द.वि. कलम ३७९.
७) श्रीरामपुर शहर पो.स्टे. जिल्हा अहिल्यानगर गुरनं ५१२ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२).
यातील ताब्यात घेतलेले आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयांमध्ये चोरीस गेलेल्या ०४ हिरो स्प्लेंडर, ०१ बजाज २२० पल्सर, 09 बजाज प्लॅटीना, ०२ बजाज पल्सर, ०१ रॉयल इनफिल्ड बुलेट, ०१ होण्डा युनिकॉर्न अशा एकुण चोरीच्या १० मोटर सायकल किं. रू. ८ लाख ३५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
   सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुरनं ३३३ / २०२४ भा.द.वि.क. ३७९ या गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 
 
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटरसायकल चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत केल्या आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *