स्वीकृत नगरसेवक सोनल अजमेरे यांचे खोटे प्रतिज्ञापत्राबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी

author
0 minutes, 4 seconds Read
Spread the love

  कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत स्वीकृत नगरसेवक हे पद २०१० च्या निकषानुसार पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा अहर्तामध्ये सेक्शन ४ मध्ये दिलेल्या नियमानुसार नुसार पात्र असावा लागतो. यानुसार कोल्हे गटाच्या सोनल अजमेरे यांनी सेक्शन ४ प्रमाणे नामनिर्देशन अहर्ता छ प्रमाणे धारण करून त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. मात्र यामध्ये सोनल अजमेरे यांनी दाखवलेली संजीवनी सांस्कृतिक मंडळ, सहजानंदनगर, शिंगणापूर ही संस्था कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रात येत नाही. तसेच  संजीवनी सांस्कृतिक मंडळ संस्थेच्या घटनेनुसार कार्यकारी मंडळावर नियुक्तीसाठी संबंधित व्यक्ती किमान एक वर्ष संस्थेची सभासद असणे आणि संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा कायम सेवक असणे आवश्यक आहे. 

   त्यामुळे या अटींमध्ये नगरसेविका सोनल अजमेरे बसत नसून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे. स्वीकृत नगरसेवक पद २०१० च्या निकषानुसार पात्र उमेदवारासाठी राखीव असताना सोनल अजमेरे यांनी चुकीची माहिती देवून त्यांनी फसवणूक केली आहे. सोनल अजमेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदी झालेली निवड हि पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा दावा प्रकाश दुशिंग यांनी केला आहे.

   याप्रकरणावर जिल्हाधिकारी व अहिल्यानगर सह आयुक्त (न.प.प्र.) सुनावणी घेणार असून अर्जदार प्रकाश दुशिंग आणि पदनिर्देशीत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, शिर्डी आणि सोनल अजमेरे यांना संबंधित कागदपत्र, ओळखपत्रासह समक्ष नचुकता उपस्थित राहण्याची सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *