सिन्नर,दि.३०-दुपारी ३.२० च्या सुमारास मेघ गर्जनेसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला असून गहू,आंबा,डाळिंब,मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पाथरे परिसरात गारा पडल्यामुळे आंबा,डाळिंब,गहू पिकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक आर.बी.चिने यांनी केली आहे.