जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.१२- दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यामध्ये खोडवा व्यवस्थापन,उपलब्ध पाण्याचे नियोजन करून नवीन ऊस लागवड,बेणे मळा तयार करण्याबाबत ऊसपीक तज्ञ डॉ. संजीव माने उद्या शुक्रवार ता.१३ रोजी नॅचरल उद्योग समुहाचे वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे.
नॅचरल शुगर रांजणी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चालू वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सकाळी साडे दहा वाजता ऊस पिकातील तज्ञ कृषिरत्न डॉ. श्री संजीव माने आष्टा सांगली यांचे कमी पाण्यामध्ये खोडवा व्यवस्थापन,उपलब्ध पाण्याचे नियोजन करून नवीन ऊस लागवड, बेणे मळा तयार करणे तसेच पाचट आणि हिरवे वाढे यापासून मुरघास कसा तयार करावा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषीरत्न बी बी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास श्री साई मंगल कार्यालय साखर कारखाना रांजणी येथे उपस्थित रहावे असे आवाहन नॅचरल उद्योग समुहाचे वतीने करण्यात आले आहे.