नॅचरल शुगर ठिबक सिंचन आणि मुरघास करण्यासाठी शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदान देणार-बी.बी.ठोंबरे

author
0 minutes, 6 seconds Read
Spread the love

नॅचरल शुगर ठिबक सिंचन आणि मुरघास करण्यासाठी शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदान देणार-बी.बी.ठोंबरे

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी

        धाराशिव,लातूर व बीड जिल्हयातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी दुष्काळी  परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन,बेणे मळा संगोपन आणि पाचट व बगॅस पासून उत्कृष्ट चारा निर्मिती मार्गदर्शन करणेसाठी आज साई मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.तज्ञ ऊस उत्पादक कृषिरत्न डाॅ. संजीव माने,पशू वैद्यकीय महाविद्यालय,उदगीरचे पशू आहार तज्ञ,डाॅ. प्रफुल्ल कुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.

     डाॅ.संजीव माने यांनी दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊसाचा खोडवा मोडू नये, त्याचे थोडे व्यवस्थापन केले तर तो चांगले उत्पादन देवू शकतो. ऊस खोडवा जोपासण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.डाॅ.प्रफुल्ल कुमार पाटील यांनी जनावरांसाठी पाचट व बगॅसपासून उत्कृष्ट व कमी खर्चात मुरघास तयार करण्याचे मार्गदर्शन केले.तसेच पाचटापासून केलेल्या मुरघासाचे प्रात्यक्षिकही सर्वांसमोर सादर केले.

     नॅचरल शुगर सदैव शेतक-यांचे पाठीशी उभा आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांनी ऊस खोडवा न मोडता त्याचे शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापन करावे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शेतक-यांना नाॅन आएसआय ठिबकसाठी कारखान्याकडून मदत केली जाणार आहे. शेतक-यांनी दहा टक्के रक्कम भरणा केल्यानंतर त्यांना नाॅन आयएसआय ठिबक उपलब्ध करून दिले जाणार आहे, त्यामध्ये कारखान्यामार्फत २५ टक्के अनुदान आणि श्री साई पतसंस्थेमार्फत ६५ टक्के कर्ज स्वरूपात दिले जाणार आहे दुष्काळी परिस्थितीत खोडव्यासाठी झेंबा खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता आहे व ते पाणी पिकाचे आवश्यकतेनुसार दिले जाते. तसेच कारखान्यामधील उत्पादित खते ही ऊस पिकासाठी उधारीवर देणार आहे.दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे कारखान्यामार्फत करण्यात येणार आहेत तसेच शेतक-यांसाठी जलतारा ही योजना कारखान्यामार्फत राबविण्यात येणार असून ती शंभर टक्के अनुदानावर करण्यात येणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *