मुंबई,दि.१६- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राला पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले असून शहा वीज उपकेंद्रातून पोहेगाव वीज उपकेंद्राला लवकरच वीजपुरवठा सुरू होवून पोहेगाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांचा विजेचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कायमचा सुटला आहे.
पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न कोपरगाव,दि.१५:- राजकारणात फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील सहा वर्षात विकासकामांवर भर देवून दशकानुदशके प्रलंबित असलेली विकास कामे पूर्ण केली असून राजकारण विकासाचे करतो आणि जे करतो तेच जनतेसमोर मांडतो असे स्पष्ट मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले आहे.
कोपरगाव,दि.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाकडून आयोजित रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी संस्थेचे शैक्षणिक निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य वसीम शेख व कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे उपस्थित होते. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून न […]
मुंबई,दि.१३-कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध गौण खनिजाचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.यामुळे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून माती, वाळू आणि मुरूमाची अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आ.आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेदरम्यान या ज्वलंत मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले. कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असून ठिकठिकाणी […]
मुंबई,दि.१२-कोपरगाव तालुक्यातीलकाकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यापासूनम्हणजेच २०१६ पासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत आवाज उठवला असून काकडी विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आणि काकडी ग्रामपंचायतीचा ९ कोटीचा थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आदेश एमएडीसीला द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत केली आहे. आमदार […]
मुंबई,दि.११- अतिशय कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत असलेल्या राज्यातीलशेतकऱ्यांच्या अनंत अडचणी लक्षात घेतल्यास शेतकऱ्यांनाकर्जमाफी करण्याची अत्यंत आवश्यकता होती.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना महायुती शासनाने कर्जमाफी करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे.परंतु कर्जमाफी करतांना पीक कर्जासह मध्य मुदत व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांचाही थकबाकीमध्ये समावेश करणे गरजेचे असून त्याशिवाय शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार नाही. तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात […]
नाशिक,दि.१०-संगीता गणेश फडे,रा.लालपाडी,ता.निफाड ह्या मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेत मुलांसाठी खेळणी घेत असताना अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली असून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.९-आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ बौद्धिक क्षमता असून चालत नाही तर माणसाला आपल्या भावनांचे योग्य नियोजन करता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोळपेवाडी येथे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर दि. ६ व ७ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे […]
नाशिक,दि.८-सजनराज कचरदास पारख,येवलकर जीन,नांदगाव यांच्या आडत दुकानातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रोख रक्कमेची चोरी केली असून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक भदाणे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या आहे.
कोपरगाव,दि.७-राज्य शासनाच्या माध्यमातून पशु-पक्ष्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी गावागावात सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींच्या प्रजातींची वाढ करून कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सकारात्मक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती […]
नाशिक,दि.६-जालिंदर परशराम जाधव रा.ममदापुर,ता. येवला यांच्या गट नंबर ५८/ब तील विहरीतून ५ एच.पी च्या दोन मोटारींची चोरी झाली असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव, दि.५- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर येथे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर ६ व ७ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी दशेत प्रामुख्याने अध्यापनामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? आणि विविध विद्याशाखांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध कसा येतो? या महत्त्वपूर्ण पैलूंवर भारतातील विविध राज्यांमधून येणारे तज्ज्ञ […]
कोपरगाव,दि.४- कोपरगाव नगरपरिषदेचे कोल्हे गटाच्या विद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीत खोटे प्रतिज्ञापत्राच्या मदतीने पद मिळवले असून त्यांचे पद रद्द करण्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाच्या माध्यमातून केला होता याबाबत शुक्रवार दि.६ रोजी दुपारी ४ वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी करण्यात येणार आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या […]
कोपरगाव,दि.३-विज्ञानाची कास धरून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकररावजी काळे साहेब एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा संशोधन वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट प्रत्यय आला. कार्यक्रमाचे उद्घाटन […]
कोपरगाव,दि.२-राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण ही चिंतेची बाब बनली आहे.शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी अडचणीत […]