author

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला अवकाळी पावसाने झोडपले,गारपीटमुळे लाखोंचे नुकसान

सिन्नर,दि.३०-दुपारी ३.२० च्या सुमारास मेघ गर्जनेसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला असून गहू,आंबा,डाळिंब,मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पाथरे परिसरात गारा पडल्यामुळे आंबा,डाळिंब,गहू पिकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक आर.बी.चिने यांनी केली आहे.

काय सांगता शेडमधून दीड लाखांचे बेदाणे चोरीला

नाशिक,दि.२९-२० किलो बेदाणे भरलेले २५ कॅरेट असा दीड लाखांचा माल सचिन बाळासाहेब जाधव रा.लोनवाडी,पिंपळगाव यांच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन भुमीपुजन कार्यक्रमावर उपसभापती,संचालकांचा बहिष्कार

कोपरगाव,दि.२८:- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उद्या रविवार दि.२९ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भुमीपुजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने  राष्ट्रसंत तुकडोजी […]

गांजा लावायची गरज पडणार नाही शेतीमालाला रास्त भाव द्या-सत्तार पटेल

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२७-लातूर जिल्ह्यामध्ये गांजा लावल्याप्रकरणी एका शेतकऱ्यावर गुन्हा नोंद तर दुसऱ्या शेतकऱ्याने खसखसची लागवड केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.महत्त्वाचा विषय जो आहे तो असा की “मरता क्या नही करता” या म्हणीप्रमाणे ज्या वेळेस शेतकऱ्याच्या शेतीमालाला खर्चही भरून निघणार नाही असा भाव मिळत असेल तर शेतकरी ते पीक काय म्हणून लावतील.सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यावर […]

मिठसागरे येथे रामनवमी उत्सव साजरा

गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.२७-तालुक्यातील मिठसागरे येथे गेल्या ६१ वर्षांपासून सुरू असलेला रामनवमी उत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सात दिवस दैनंदिन हरिपाठ, किर्तन भजन व पारायण, रामनवमीच्या दिवशी फराळ पंगत होऊन आज किर्तन होऊन सांगता करण्यात आली.    यावर्षी इयत्ता दहावी सन १९८८- ८९ च्या बॅचने फराळाच्या पंगतीची धुरा सांभाळली.नानासाहेब चतुर, बापूसाहेब चतुर,राजेंद्र कथले,आनंदा कांदळकर, सर्जेराव […]

साईभक्तांना लस्सी व मसाला ताक वाटप

शिर्डी,दि.२६- श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव ते शिर्डी साईगाव पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साईनामाच्या गजरात, ‘जय साईराम’ आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. हजारो साईभक्त निःस्वार्थ भावनेने, पायी चालत साईबाबांच्या पवित्र दर्शनासाठी मार्गस्थ झाले होते.    याभक्तिमय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीला […]

वावी कहांडळवाडी रस्ता दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात १० कोटी निधीची तरतूद

सिन्नर,दि.२६-नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या वावी कहांडळवाडी रस्त्याची अनेक वर्षांपासून झालेली चाळण व दुर्दशाबाबत निखिल भेंडाळे यांनी  ग्रामस्थांबरोबर केलेल्या पोलीस ठाण्यातील आंदोलनाला यश मिळाले असून अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची मंजुरी दुरुस्तीसाठी मिळाली आहे.     रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने वाहन चालवणे तर लांबच पायी चालतानाही कोणता खड्डा चूकवावा आणि कोणता नाही असाच प्रश्न पडलेला असताना […]

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण निश्चित करा

मुंबई,दि.२५-राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने कांदा प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी बुधवारी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. याबैठकीत आ. आशुतोष यांनी मुख्यमंत्र्यांकडे कांदा प्रश्नावर ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी केली.    राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्ती […]

नॅचरल डेअरी दुष्काळी भागात यशस्वी दुधउद्योग करण्याचे नेतृत्व करणारा प्रकल्प-बी.बी.ठोंबरे

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२४-नॅचरल उद्योग समुहातील नॅचरल डेअरीचा १५ वा वर्धापन दिन व सौर ऊर्जा विस्तारीत प्रकल्पाचा प्रारंभ पशू आहार तज्ञ डाॅ.पराग घोगळे,पुणे यांचेहस्ते व नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्नझाला.यावेळी जेष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, संचालक अनिल ठोंबरे,एन साई मल्टी स्टेट सोसायटीचे उपाध्यक्ष किशोर डाळे,समन्वयक श्रीपाद ठोंबरे, सर्जेराव साळूंके उपस्थित […]

नांदूरशिंगोटे येथे ज्वेलर्स दुकानातून भरदिवसा ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला

सिन्नर,दि.२२- तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे भरदिवसा ज्वेलर्स दुकानातून तीन अज्ञात महिलांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.      नांदूरशिंगोटे येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक सुबोध अशोक माळवे (४१) यांनी तक्रार दिली आहे. सायंकाळी सुमारे ५.१५ ते ५.३५ वाजेच्या दरम्यान तीन अज्ञात महिला ग्राहक बनून त्यांच्या दुकानात […]

राघोबादादावाडा संवर्धनासाठी दुसऱ्या हफ्त्याचा ३.६२ कोटी  निधी मंजूर

कोपरगाव,दि.२१- शहरातील  ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता. याची गांभीर्याने दखल घेवून या वाडा संवर्धनासाठी आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. त्यातील ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या दुसऱ्या हफ्त्याच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली […]

वडगावपान प्रकरणातील आरोपीला फाशी द्या-संविधान सन्मान समितीची मागणी

सिन्नर,दि.२०-संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील बारा वर्षाच्या निष्पाप शालेय विद्यार्थिनीवर भरस्त्यात भीषण ऍसिड हल्ला करणाऱ्या नराधमाला अटक करून  फाशीची शिक्षा द्या असे निवेदन संविधान सन्मान समितीकडून सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.       यावेळी संदीप भालेराव,गौतम खरात,राहुल जाधव,तुषार जाधव,शशिकांत आढागळे,सतिश साबळे,देविदास आढागळे,सचिन गवारे,भूषण जाधव,सुशांत जगताप, शिरसाट नितीन,जगताप दर्शन,भाऊसाहेब शिंदे,गणेश […]

सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

सिन्नर,दि.१९-आता दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाकासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणी गारा पडल्याचेही वृत्त समजत आहे.

हिंदुस्तान फीड्सच्यावतीने  विद्यार्थ्यांना टिफिन व बॅगचे वाटप

सिन्नर,दि.१८- सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील वावी,घोटेवाडी व वल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हिंदुस्तान कॅटल फीड्स पशुखाद्य कंपनीच्यावतीने विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व बॅग वितरित करण्यात आली.      पशुखाद्यकंपनीचे विक्रेते धिरज भुतडा यांनी कंपनीकडे पाठपुरावा करून सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तूची मागणी केली होती त्याला कंपनीचे व्यवस्थापक सागर कापकर यांनी तात्काळ मंजुरी देत […]

लग्नसमारंभातुन घरी जात असताना दागिने ओरबडले

सिन्नर,दि.१७- नातेवाइकाच्या लग्नसमारंभातून घराकडे पायी परत जात असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत असलेल्या मुक्तेश्वरनगर परिसरात घडली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिराबाई भागवत क्षीरसागर (वय ६०, रा. मुक्तेश्वरनगर, सिन्नर) असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. मुक्तेश्वरनगर परिसरात असलेल्या ज्वालामाता लॉन्स येथे त्यांच्या नातेवाइकाचा […]